मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या मालकीची असलेली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Infrastructure) ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीचे समभाग गेल्या चार वर्षांत 9 रुपयांवरून थेट 200 रुपयांवर पहोचले आहेत. म्हणजेच या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत 2200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करणारे दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. 


एका लाखाचे झाले 23 लाख रुपये


रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरचे म्लूय 27 मार्च 2020 रोजी 9.20 रुपये होते. 21 जून 2024 रोजी हाच शेअर थेट 214.85 रुपयांवर पोहोचला. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदा कामगिरी करत त्याच्या मूल्यात 2000 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते. तर तर आज याच पैशांचे थेट 23.35 लाख रुपये झाले असते. अवध्या चार वर्षांत या कंपनीने ही व्यक्ती थेट लखपती झाली असती. 


एका वर्षात 45 टक्क्यांनी वाढ  


या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात 45 टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर 147.75 रुपयांवरून 214.85 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरध्ये 137 टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर 28 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 52 आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य 308 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य 134.85 रुपये आहे.


विजय केडिया यांनी खरेदी केलेत 4000000 शेअर्स


दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च 2024 च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे 40 लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी 1.01 टक्का आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मोठी बातमी! ...तोपर्यंत फोन पे, क्रेड ॲपवरून भरता येणार नाही क्रेडिट कार्डचे बील; 30 जूननंतर काय बदलणार?