Weddings News : सध्या देशातील अनेक भागात लग्नसराईची (Weddings) घाई पाहायला मिळत आहे. चालू महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्यानं लग्नाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. या हंगामात देशात 45 लाख विवाह होणार आहेत. त्यामुळं या हंगामात 5.5 लाख कोटींचा व्यवसाय होणार आहे. या काळात एकट्या दिल्लीत दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
व्यापारी वर्गात लग्नसराईची उत्सुकता
दिल्लीसह संपूर्ण देशातील व्यापारी वर्गात लग्नसराईची उत्सुकता पाहायला मिळत आहे. खरंतर, 15 जानेवारी ते 15 जुलैपर्यंत चालणाऱ्या या हंगामात देशात 45 लाख विवाहसोहळे होतील असा अंदाज आहे. देशात होणाऱ्या या विवाहसोहळ्यांमध्ये सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज आहे. अंदाजे 5 लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च 3 लाख रुपये असेल, तर अंदाजे 10 लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च अंदाजे 6 लाख रुपये असेल. याशिवाय, 10 लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति विवाह 10 लाख रुपये असेल, तर 10 लाख विवाहांसाठी प्रत्येक लग्नासाठी 15 लाख रुपये खर्च येईल. देशातील व्यावसायिकांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ची संशोधन शाखा कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने विविध राज्यांतील 30 वेगवेगळ्या शहरांतील व्यापारी आणि सेवा पुरवठादारांशी केलेल्या संभाषणाच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे.
एकट्या दिल्लीत दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार
या लग्नसराईच्या हंगामात एकट्या दिल्लीत 4 लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे. ज्यातून सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय महसूल मिळणार आहे. गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी संपलेल्या लग्नाच्या मोसमात सुमारे 35 लाख विवाह झाले होते, ज्याचा खर्च 4.25 लाख कोटी रुपये होता. या लग्नसराईच्या काळात अंदाजे 5 लाख विवाहांचा प्रति विवाह खर्च 3 लाख रुपये असेल, तर अंदाजे 10 लाख विवाहांसाठी प्रति विवाह खर्च अंदाजे 6 लाख रुपये असेल असा अंदाज आहे. याशिवाय, 10 लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति विवाह 10 लाख रुपये असेल, तर 10 लाख विवाहांसाठी प्रति लग्न 15 लाख रुपये खर्च येईल, तर 6 लाख विवाहांसाठी प्रति लग्न 25 लाख रुपये खर्च येईल. याशिवाय 60 हजार विवाह ज्यांचा खर्च प्रति लग्न 50 लाख रुपये असणार आहे, तर 40 हजार विवाह ज्यांचा खर्च 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. लग्नाची ही मागणी लक्षात घेऊन देशभरातील संबंधित व्यापाऱ्यांनी लग्नाशी संबंधित वस्तूंचा पुरेसा साठा केला आहे. जेणेकरून ग्राहकांची पसंती आणि मागणी पूर्ण करता येईल.
लग्नाच्या हंगामापूर्वी घर दुरुस्ती आणि रंगकामाचा मोठा व्यवसाय
लग्नाच्या हंगामापूर्वी घर दुरुस्ती आणि रंगकामाचा मोठा व्यवसाय होतो. याशिवाय दागिने, साड्या, लेहेंगा-चुनरी, फर्निचर, रेडीमेड कपडे, फॅब्रिक्स, पादत्राणे, लग्न आणि शुभ कार्ड, ड्रायफ्रुट्स, मिठाई, फळे, पूजा वस्त्रे, किराणा, धान्य, सजावटीचे कापड, होम डेकोर, इलेक्ट्रिकल युटिलिटीज इत्यादी आणि विविध भेटवस्तूंना सर्वाधिक मागणी आहे. ज्यांना त्या हंगामात मोठा व्यवसाय मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या: