Motherhood Planning: आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करताना दिसतात. हे काम करत असताना महिलांना सातत्यानं विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. कोरोना नंतरच्या काळात महिला एकाच वेळी वैयक्तिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या घेत आहेत. मातृत्व हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. आई होण्यापूर्वी  महिलांनी आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. ते नियोजन करताना नेमकं काय कराल याची माहिती पाहुयात.  


कोरोनाच्या संकटानंतर एका नव्या युगाला सुरुवात झाली आहे. या काळानंतर लोकांची जीवनशैली, आरोग्य यामध्ये बदल झाले आहेत. वित्त नियोजनाच्या बाबतीतही लोक जागरुक झाले आहेत. हिला आर्थिक नियोजनाच्या बाबतीत विशेष दक्ष असतात, कोविडच्या काळात महिलांनी आर्थिक शिस्तीचे उदाहरण घालून दिले. आता यातून धडा घेऊन पुढील तयारी करण्याची गरज आहे.


आरोग्य विम्याची वाढती जागरुकता


कोरोना महामारीच्या काळात अनेकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळं याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. यातून आर्थिक नियोजन किती महत्त्वाचे आहे हे लोकांना कळले आहे. साथीच्या आजाराने लोकांना आरोग्य विम्याची जाणीव करून दिली. चांगली गोष्ट अशी आहे की महिलांनीही महामारीच्या काळात अनेक संकट आली आहे. त्यामुळं महिला आता आरोग्य विम्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहेत. आरोग्य विमा काढणे गरजेचं आहे.


पैशांची बचत करण्यासाठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. पैसे अकाऊंटमध्ये असेच ठेवण्यापेक्षा गुंतवणूक केल्यास ती रक्कम वाढते. त्यामुळं महिलांनी गुंतवणुकीकडे लक्ष द्यावं.


बतचतीच्या बाबतीत जागरुक


न्यू हेल्थ नॉर्मल अहवालानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिला या चैनीसाठी लागणाऱ्या वस्तूंचाय खर्चात कपात करण्याचा विचार करत आहेत. महिला या आरोग्याशी संबंधित गरजांच्या तयारीकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महिलांमध्ये अजूनही अनिश्चिततेची भावना आहे. 


हे बदल महिलांमध्ये आढळतात


कोरोना काळानंतर सर्वसमावेशक आरोग्य सेवेकडे लोकांचा कल वाढला आहे. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आहार, व्यायाम आणि फिटनेस महत्त्वपूर्ण आहे. महिलांना चांगल्या आरोग्यासाठी, विशेषत: मातृत्वाच्या काळात पौष्टिक आहाराचे महत्त्व कळले आहे. मुलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना सकस आहाराच्या सवयी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा महिला प्रयत्न करत आहेत. 


गरोदर महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं


आरोग्य निरीक्षणाच्या दृष्टीने, गरोदर मातांना नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. वेळोवेळी व्हर्च्युअल सल्ला, फिटनेस अॅप्स यावर लक्ष देणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात स्त्रिया इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरुन त्यांच्या आरोग्यावर आणि शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाधिक पुढाकार घेत आहेत. पुरुषांच्या तुलनेत 68 टक्के स्त्रिया नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. 


महत्त्वाच्या बातम्या:


World News: 31 वर्षांच्या महिलेने साठवले 12 कोटी रुपये! श्रीमंत होण्यासाठी सांगितले सेव्हिंगचे 5 फंडे