नवी दिल्ली : भारतात मालमत्ता खरेदी करू पाहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (NRI) बंगळूरमध्ये (Bengaluru) मालमत्ता खरेदी करायची आहे. हे सर्वेक्षण 12,000 अनिवासी भारतीयांवर करण्यात आले. कर्नाटकातील बंगळूर हे अनिवासी भारतीयांची (NRI) पहिली पसंती बनले आहे. प्रोपटेक युनिकॉर्न नोब्रोकरच्या अलीकडील सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 12,000 अनिवासी भारतीयांपैकी 45 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना भारतात मालमत्ता खरेदी करायची आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भारतातील सहा शहरांपैकी दिल्ली एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि पुणे यापैकी त्यांना मालमत्ता कोणत्या ठिकाणी खरेदी करायची आहे? तर, या अनिवासी भारतीयांपैकी 29 टक्के लोकांनी बंगळूरमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात रस दाखवला, तर 24 टक्के लोकांनी मुंबईत आणि 18 टक्के हैदराबादमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात रस दाखवला.
या संदर्भात, कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) चे अध्यक्ष किशोर जैन यांनी भर दिला की बंगळूरची मालमत्ता जगभरात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना गुंतवणूक करण्यास प्रेरित करत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ते म्हणाले की अनिवासी भारतीयांना त्यांच्या देशात अधिक सुरक्षित वाटते आणि त्यांना बंगळूरमध्ये त्यांच्या आवडीची जीवनशैली मिळते.
'अनिवासी भारतीय बंगळूरला सुरक्षित ठिकाण मानतात'
जैन म्हणाले की, पायाभूत सुविधांची आव्हाने असूनही, शहर अनिवासी भारतीयांसाठी स्वीकार्य आणि सुरक्षित ठिकाण आहे. हे घटक त्यांना बंगळूरमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. 57 टक्के अनिवासी भारतीयांना स्वतःसाठी मालमत्ता खरेदी करायची आहे. नोब्रोकरच्या मते, 57 टक्के एनआरआय मालमत्ता खरेदीदारांनी सांगितले की ते स्वतःसाठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत, तर 43 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना भारतात त्यांच्या कुटुंबासाठी मालमत्ता खरेदी करायची आहे.
UAE मध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतात मालमत्ता खरेदी करायची आहे
नोब्रोकरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी सौरभ गर्ग म्हणाले की, भारतात मालमत्ता खरेदी करू पाहणारे बहुसंख्य अनिवासी भारतीय हे UAE आणि US मधील आहेत आणि त्यापैकी 37 टक्के IT/तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून काम करतात. ते म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत भारतातील रिअल इस्टेटमधील अनिवासी भारतीयांच्या इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भाडेवाढ, भारतीय रुपयाची सतत घसरण, अनुकूल सरकारी धोरणे आणि प्रतिकूल परिस्थितीत रिअल इस्टेट क्षेत्राची लवचिकता यासारख्या कारणांमुळे हे घडले आहे. गर्ग पुढे म्हणाले की, आकर्षक परतावा मिळविण्यासाठी काही काळापासून रिअल इस्टेट हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम राहिले आहे यावर जोर देणे महत्त्वाचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या