Income Tax Department : इन्कम टॅक्स विभागाने आता रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर मोर्चा वळवला आहे. यामध्ये रुग्णालये, बँक्वेट हॉल तसेच काही व्यावसायिकांवर इन्कम टॅक्स विभागाने करडी नजर ठेवत लक्ष केंद्रीत केलं आहे. 


अलीकडेच आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये अलवर, कोटा आणि जालना यांसारख्या लहान शहरांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून स्टील बार उत्पादकांवरील अलीकडील धडक कारवाईनंतर मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि जालना येथून मोठ्या प्रमाणात रोख आणि दागिने जप्त करण्यात आले होते. 


बर्‍याच लहान शहरांमध्ये आयकर विभागाचे विभागाचे जाळे नसल्याने कर चोरी करणार्‍यांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे. बहुतेकदा आपण चौकशीच्या रडारवर येणार नाही असाही त्यांचा कयास असतो, असेही अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी दैनिकाला माहिती देताना सांगितले. चालू आर्थिक वर्षात, रोखीच्या व्यवहारांवर आणि अनेक व्यवसायांवर विशेष भर देण्यात आला आहे जिथे अजूनही व्यवहार रोखीने होत आहेत आणि ते स्कॅनरच्या कक्षेत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 


रुग्णालयांच्या बाबतीत, अधिकार्‍यांनी सांगितले की, कायद्याने अनिवार्य असतानाही पॅन घेतला जात नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. विभाग यासाठी प्रयत्न करत असताना आणि चुकीच्या रुग्णालयांवर कारवाईची योजना आखत असताना, खासगी आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या रकमेचा भरणा केलेल्या रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी ते आरोग्य सेवा प्रदात्यांकडे उपलब्ध डेटा वापरत आहेत. तथापि,रुग्णालयांनी पॅन घेणे नेहमीच शक्य नसते, कारण रुग्ण अनेकदा आपत्कालीन विभागात येतात, असा युक्तीवाद करत बचाव केला आहे. 


त्याचप्रमाणे, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये काही बँक्वेट हॉलवर कारवाई करण्यात आली आहे, तरीही त्यांच्या पुस्तकांमध्ये व्यवहार नेहमीच दिसून येत नाहीत. अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, काही व्यावसायिकह आयकर विभागाच्या रडारवर आहेत. ज्या ठिकाणी ठोस पुरावे आहेत तिथे कर अधिकारी त्यांच्या विरोधात हालचाली करत आहेत. उदाहरणार्थ, अलिकडच्या काही महिन्यांत काही वास्तुविशारदांवर काही कारवाई करण्यात आल्या आहेत, ते म्हणाले की, सर्वच व्यावसायिकांची चौकशी केली जात आहे असे नाही.


इतर महत्वाच्या बातम्या