Congress President Election : या आठवड्यात काँग्रेसमध्ये पक्षातंर्गत निवडणूका होत आहेत. मात्र, काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत अद्याप स्पष्ट संकेत अजूनही मिळालेले नाहीत. राहुल गांधी यांना पक्षाकडून विनंती होत असतानाही त्यांनी मागणी धुडकावून लावली आहे.


2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा दिल्यानंतर पक्षातील वरिष्ठांचे आवाहन फेटाळून लावणारे राहुल गांधी अजूनही काँग्रेस अध्यक्ष होऊ नये यावर ठाम आहेत. त्यामुळे या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? की पुन्हा सोनिया गांधी यांनाच अंतरिम अध्यक्ष पुन्हा केले जाणार? याकडे लक्ष लागले आहे.  


सोनिया गांधी यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभापतीपदाची जबाबदारी पार पाडण्यास नकार दिला आहे. तसेच, सूत्रांचे म्हणणे आहे की आता सर्व लक्ष प्रियंका गांधींकडे वळले आहे, कारण पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबातील सदस्याकडेच राहावे अशी पक्षातील बहुतेक सदस्यांची इच्छा आहे.


एकमत नसताना आजपासून सुरू होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. पक्षाने या वादावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. काँग्रेसचे दिग्गज नेते भक्त चरण दास यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, होय, राहुल यांनी अध्यक्षपदामध्ये स्वारस्य नसल्याचे सांगितले आहे. परंतु, आम्ही त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करत आहोत. अखेर हे पद कसे भरायचे हे त्यांना सांगावे लागेल.


मात्र, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराची आघाडी सरकारविरोधातील सांभाळत आहेत. सप्टेंबरमध्ये ते एका विशाल रॅलीला संबोधित करतील आणि कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू करतील. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा म्हणाले की, होय, आम्ही रॅलीचे आयोजन करत आहोत आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आम्हाला खात्री नाही.


काँग्रेसची अध्यक्षपदावरून ससेहोलपट गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. वारंवार पदरी पडलेला निवडणुकीतील पराभव आणि उच्चपदस्थ नेत्यांनी पक्षाला रामराम केल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे.