Who Is Tesla CFO Vaibhav Taneja : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी टेस्ला (Tesla) कंपनीची महत्त्वाची जबाबदारी भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती दिली आहे. एलॉन मस्क यांनी कार निर्माती कंपनी टेस्लाच्या CFO म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer) पदी भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दिल्ली विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीचं टेस्लाचे भारतात पहिलं ऑफिस पुण्यात सुरु केलं आहे. त्यानंतर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला CFO पदाची जबाबदारी देणं हे भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने एलॉन मस्क यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.


भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी


भारतात प्रवेश केल्यानंतर अमेरिकन वाहन निर्माता कंपनी टेस्लाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केल्याचं जाहीर केलं आहे. टेस्लाचे सीएफओ झाचेरी किरखॉर्न (Zachary Kirkhorn) यांनी चार वर्षांनंतर CFO पदावरून पायउतार झाले आहेत. आता त्याची जागा भारतीय वंशाचा वैभव तनेजा घेणार आहेत. वैभव तनेजा हे सध्या टेस्ला येथे मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounts Officer) आहेत. त्यांच्यावर आता CFO पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.


एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय


भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांनी टेस्लाचे सीएफओ पदी नियुक्त करण्यात आलं आहे. एकीकडे, टेस्ला भारतात आपला जम बसवण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहे. दुसरीकडे भारतीय वंशाचे लोकांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे. टेस्ला कंपनीने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नवीन CFO म्हणून नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा टेस्ला कंपनीमध्ये 13 वर्षे काम करत आहेत. त्यानंतर त्यांच्या आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.


दिल्ली विद्यापीठ ते टेस्लापर्यंतचा प्रवास


वैभव तनेजा हे 45 वर्षांचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर 2016 मध्ये सोलारसिटी ताब्यात घेतल्यानंतर ते टेस्लाच्या कंपनीमध्ये रुजू झाले. टेस्ला कंपनीने म्हटले आहे की, मुख्य लेखा अधिकारी (Chief Accounts Officer) म्हणून त्यांच्या प्राथमिक जबाबदारीव्यतिरिक्त त्यांनी कंपनीमध्ये 'मास्टर ऑफ कॉईन' ची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे."


वर्षाअखेरी पर्यंत किरखॉर्न पदावर कायम


दरम्यान, टेस्ला कंपनीने या बदलाचे कोणतंही कारण दिलेलं नाही. पण काम सुरळीत चालण्यासाठी किरखॉर्न हे या वर्षाच्या अखेरीपर्यंत CFO पदावर कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे. किरखॉर्न यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "या कंपनीचा एक भाग बनणे हा एक खास अनुभव आहे आणि कंपनीत 13 वर्षांपूर्वी सामील झाल्यापासून केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे."