Mobile Tariff in 2022: टेलिकॉम कंपन्या नव्या वर्षात पोस्टपेड ग्राहकांना दरवाढीचा झटका देण्याची दाट शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात प्रीपेड मोबाइल दरात 20 ते 25 टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर आता पोस्टपेडच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 5-जी सेवेसाठीच्या स्पेक्ट्रमच्या लीलावात बोली लावण्यासाठी पैसे जमवण्यासाठी आणि कंपनीची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या दरवाढीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. 


टेलिकॉम क्षेत्रातील जाणकरांनी सांगितले की, प्रीपेड टॅरिफमध्ये वाढवल्यानंतर पोस्टपेड दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. पोस्टपेडचे दर वाढवल्यानंतरही टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसत नाही. पोस्टपेड ग्राहक दर वाढवल्यानंतरही सहसा मोबाइल क्रमांक पोर्ट करत नाहीत. पोस्टपेड ग्राहक हे मोबाइल कंपन्यांची सेवा पाहून विचारपूर्वक क्रमांक पोर्ट करण्याचा निर्णय घेतात. पोस्टपेडच्या तुलनेत प्रीपेड ग्राहक अधिक जलदपणे मोबाइल क्रमांक पोर्ट करतात. 


महसूलासाठी पोस्टपेड ग्राहक महत्त्वाचे


टेलिकॉम कंपन्यांना महसूलासाठी पोस्टपेड ग्राहक महत्त्वाचे असतात. टेलिकॉम कंपन्यांना 15 टक्के महसूल हा पोस्टपेड ग्राहकांकडून मिळतो. 50-60 टक्के ग्राहक एंटरप्राइझ ग्राहक आहेत आणि 34 टक्के पोस्टपेड ग्राहक देशातील तीन मेट्रो शहरांमधून आणि 36 टक्के ए-सर्कलमधून आले आहेत. यापूर्वी, जुलै महिन्यात भारती एअरटेलने कॉर्पोरेट वापरकर्त्यांसाठी पोस्टपेड दरात वाढ केली होती. पोस्टपेड ग्राहकांच्या बाबतीत 43% मार्केट शेअरसह वोडाफोन आयडिया पहिल्या क्रमांकावर आहे. या सेगमेंटमध्ये भारती एअरटेलची 28 टक्के भागीदारी आहे.


भारतात मोबाइल टॅरिफ सगळ्यात स्वस्त


कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे भारतातील मोबाइल टॅरिफ दर अतिशय स्वस्त आहे. त्याचा परिणाम संपूर्ण टेलिकॉम क्षेत्रावर होत आहे. केंद्र सरकारने टेलिकॉम क्षेत्राला बेलआउट पॅकेजही दिले आहे. आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी सगळ्याच टेलिकॉम कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आता प्रीपेडनंतर पोस्टपेडचे दर वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha