Tea Prices: चहाप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता चहाच्या किंमतीत (Tea Prices) वाढ होणार आहे. यामुळं चहाप्रमेमींच्या खिशावर ताण पडणार आहे. घर, कार्यालये, संस्था, सण, कार्यक्रम अशा सर्वच ठिकाणी चहाची आवश्यकता असते. पण आता चहाच्या दरात वाढ झाल्यामुळं अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. नेमकी चहाच्या दरात का वाढ होणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत आघाडीवर


भारतातील लोकांना चहा प्यायला आवडते. चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत आघाडीवर आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. देशामध्ये आसाम आणि दार्जिलिंग चहा उत्पादनात जगभरात प्रसिद्ध ठिकाणं आहेत. चहा लोकांच्या जीवनात एकरुप झाला आहे. अनेकांची दिवसाची सुरुवातच चहा घेण्यानं होते. चहाची कमी किंमत हे देखील त्याच्या लोकप्रियतेचे कारण आहे. परंतू यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.


यावर्षी चहाचे उत्पादन कमी 


उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळं चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. परिणामी उत्पादन कमी झाले आहे. यामुळं चहाच्या दरात वाढ होणार आहे. 


आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये चहाचे उत्पादन घटणार


टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएआय) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते. आसाम आणि पश्चिम बंगामध्ये चहाचे उत्पादन कमी झाले आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाच्या बागा मागील वर्षाच्या तुलनेत मे 2024 मध्ये अनुक्रमे सुमारे 20 टक्के आणि 40 टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. टी बोर्ड ऑफ इंडिया काढलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की एप्रिल 2024 पर्यंत, आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे 8 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 13 टक्क्यांनी घटणार आहे.


प्रतिकूल हवामानाचा उत्पादनावर परिणाम


उत्तर भारतातील प्रदेश हा चहा उद्योगासाठी योग्य नाही. प्रतिकूल हवामानामुळं उत्तर भारतात चालू पीक वर्षात चहा उत्पादनात घट होणार आहे. जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादन कमी होणार आहे. एका चहापान संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केली असता देशातील चहाचे उत्पादन कमी होत असल्याचे दिसते. 


महत्वाच्या बातम्या:


Food : उन्हाळ्यात तुमचीही चहाची सवय सुटत नाही? मग या रिफ्रेशिंग ड्रिंक्सने मूड करा फ्रेश, एकापेक्षा एक पर्याय..