मुंबई : प्रत्येकालाच आपल्या घरासमोर कार उभी असावी, असे वाटते. घरसमोर उभी राहणारी हीच कार नेमकी कोणती असावी? याबाबत मात्र अनेकांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. टाटा कंपनीची टाटा पंच ही कार मात्र तुमच्या कारचे स्वप्न पूर्ण करू शकते. कारण ही कार अगदी कमी किमतीत खरेदी करता येते. विशेष म्हणजे कमी कितीत या कारमध्ये टॉप फिचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या याच Tata Punch कारमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. आता Tata Punch कारच्या Adventure Persona या लोअर व्हेरियंटमध्येही कंपनीने थेट सन रुफची सोय करून दिली आहे. 


याआधी टाटा पंचच्या टॉप व्हेरियंटमध्येच इलेक्ट्रिक सनरूफ दिले जायचे. आता मात्र कंपनीने टाटा पंचच्या Adventure Persona या व्हेरियंटमध्येही सनरूफ दिले आहे. यासह कंपनीने Punch या कारच्या दुसऱ्या व्हेरियंट्समध्येही वेगवेगळे फिचर्स अॅड केले आहेत. टाटा पंच या मॉडेलमध्ये काही बदल करण्यात आलेले असले तरी या कारच्या पॉवरट्रेनमध्ये कंपनीन कोणताही बदल केलेला नाही. या कारच्या बाह्य रुपातही कोणता बदल करण्यात आलेला नाही. 


2024 Tata Punch ची किंमत काय? 


टाटा कंपनीच्या टाटा पंच या कारला आता 6.12 लाख रुपया या किमतीपासूनही खरेदी करता येईल. तर याच कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.45 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार आणखी स्वस्तात खरेदी करता यावी म्हणून कंपनीने या कार खरेदीवर साधारण 18000 रुपयांची सूट देण्याचीही सोय केली आहे. कंपनीच्या डीलरशिपच्या माध्यमातून तुम्ही कार बुक करू शकता. 


टाटा पंच कारमध्ये नेमके कोणते फिचर्स मिळणार?  


Tata Punch या कारमध्ये आता अनेक भन्नाट फिचर्स मिळणार आहेत. या कारमध्ये आता 10.25 इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळणार आहे. या इन्फोटेन्मेंट सिस्टिमला वायरलेस अँड्रॉईड आणि अॅपल कार प्लेचा सपोर्ट आहे. यासह कारच्या सर्व व्हेरियंट्समध्ये वायरलेस चार्जर, ग्राँड कंसोलसह आर्मरेस्ट, रियर एसी व्हेंट्स, टाइप सी फास्ट USB चार्जर मिळणार आहे. 


टाटा पंचमध्ये आता Sunroof मिळणार


टाटा पंच या कारच्या Adventure Persona या मॉडेलमध्ये आता कंपनीने सनरुफ दिलेले आहे. हे सनरुफ इलेक्ट्रिक असेल. सोबतच वर दिलेले फिचर्स हे टाट पंचच्या Accomplished आणि Creative Persona या मॉडेल्समध्ये मिळतील. 


हेही वाचा :


एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!


पैसे ठेवा तयार! लवकरच येणार स्विगीचा मोठा आयपीओ, पैसे कमवण्याची जबरदस्त संधी


अनिल अंबानींच्या कंपनीचा बोलबाला! शेअर तब्बल 2400 टक्क्यांनी वाढला; भविष्यातही गुंतवणूकदार मालामाल होणार?