Foxconn : भारतात (India) अनेक देशांमधील मोठ मोठ्या कंपन्या गुंतवणूक करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था वृद्धींगत होत असल्यामुळं गुंतवणूक देखील वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. तैवानच्या (Taiwan) इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीनं भारतीय कंपनी एचसीएल समूहासोबत (HCL Group) करार केला आहे. एचसीएल समूहासोबत भागीदारीत भारतात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट तयार करण्यासाठी बोली आमंत्रित केल्या आहेत. त्यामुळं तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने या प्रकल्पासाठी1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. .


फॉक्सकॉनचा भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न


तैवानची सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉन हे भारतात  नवीन नाव नाही. ॲपलची सर्वात मोठी उत्पादक फॉक्सकॉन भारतात अधिक मजबूतपणे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने भारतात सेमीकंडक्टर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी कंपनीने आधी वेदांतसोबत भागीदारी केली, पण नंतर फॉक्सकॉनला वेदांत सोडावे लागले. आता फॉक्सकॉनने देशातील सर्वात मोठ्या HCL कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी आता फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर चिप्सवर काम करेल. फॉक्सकॉननेही आपला कारखाना सुरू करण्यासाठी 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. 


तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रमुख फॉक्सकॉनने नियामक फाइलिंगनुसार, एचसीएल समूहासोबत भागीदारीत भारतात चिप असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट तयार करण्यासाठी बोली आमंत्रित केल्या आहेत. कंपनीने या प्रकल्पासाठी प्रारंभिक गुंतवणूक म्हणून 1,200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉन स्वतःच्या जमिनीवर प्लांट उभारणार आहे, जी त्याने आधीच खरेदी केली आहे. तसेच ही बोली फॉक्सकॉन हॉन हाय टेक्नॉलॉजी इंडिया मेगा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडने मागवली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.


HCL समूहासोबत भागीदारी


फॉक्सकॉन भारताच्या एचसीएल समूहासोबत देशात चिप पॅकेजिंग आणि चाचणी उपक्रम सुरू करण्यासाठी भागीदारी करत आहे. कंपनीने सांगितले की, Foxconn, तैवानच्या करार निर्मात्याचे युनिट, Hon High Technology India Mega Development Joint Venture मध्ये 40 टक्के हिस्सेदारीसाठी 37.2 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सची जगातील सर्वात मोठी असेंबलर फॉक्सकॉन, भू-राजकीय तणावामुळे भारतात विस्तारत आहे. तसेच, चीनमध्ये सतत वाढत असलेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे काम करणे खूप कठीण झाले आहे. फॉक्सकॉन ही भारतातील सर्वात मोठी iPhones निर्माता कंपनी आहे. ज्याचा एकूण उत्पादनात 68 टक्के वाटा आहे. यानंतर, पेगाट्रॉन 18 टक्के आणि विस्ट्रॉन [टाटा] 14 टक्के आहे.


महत्वाच्या बातम्या:


वेदांतासोबतचा करार तुटला, आता भारतात चिप्स बनवण्यासाठी फॉक्सकॉनसोबत नवा भागीदार; सरकारनं मागवला संपूर्ण अहवाल