Lok Sabha Election Swiggy News: सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत पाच टप्प्यातील मदतान प्रक्रिया पार पडली आहे. आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. सहाव्या टप्प्यात शनिवारी दिल्लीत मतदान होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, स्विगीने खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, मतदान केल्यानंतर, लोक बोटावर शाई दाखवून दिल्लीतील अनेक टॉप रेस्टॉरंटमध्ये जेवणावर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात.
या रेस्टॉरंटमध्ये मिळणार सवलत
अलीकडेच, मतदानाच्या 5 व्या टप्प्यात, मुंबईतील 100 हून अधिक रेस्टॉरंट्सने अशीच ऑफर चालवली होती. तिथे लोकांनी मतदान केल्याचा पुरावा दाखवून 20 टक्के सूट देण्यात आली होती. 25 मे रोजी दिल्लीतील लोक मतदान केल्यानंतर बोटावर लावलेली शाई दाखवून मिनिस्ट्री ऑफ बिअर, द दारजी बार अँड किचन, चिडो, ब्रेवोक्रेट: ब्रुअरी स्कायबार अँड किचन या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या बिलांवर तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत सूट घेऊ शकता. मतदानात नागरिकांची सक्रियता वाढवण्यासाठी स्विगीने हा पुढाकार घेतला आहे. Swiggy Dineout आणि शहरातील रेस्टॉरंट मिळून लोकांचा मतदानाचा टक्का सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.
उपक्रमामुळं मतदान वाढण्यात मतद होईल
स्विगी डायनआउटचे प्रमुख स्वप्नील बाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान करणे हा एक विशेषाधिकार आहे. तसेच जबाबदारीही आहे. Swiggy Dineout ला नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी शहरातील प्रमुख रेस्टॉरंटने पुढाकार घेतला आहे. आम्ही दिल्लीतील जनतेला मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याच्या समाधानाने तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट जेवण घ्यावे. आम्हाला आशा आहे की लोक त्यांचा लोकशाही अधिकार वापरतील. तसेच, ते देशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे बाजपेयी म्हणाले. आमच्या या उपक्रमामुळे दिल्लीतील मतदानाचा आकडा वाढण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
देशात सध्या मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. यातीलच एक प्रयोग म्हणजे विविध हॉटेलमध्ये जेवणावर सूट देणे. यामुळं लोक मतदान करतील हीच हॉटेल मालकांची अपेक्षा आहे. दरम्यान, आता फक्त दोन टप्प्यातीलच मतदान प्रक्रिया बाती आहे. उद्या म्हणजे 25 मे दिवशी सहावा टप्पा पार पडणार आहे. तर 1 जूनला मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडणार आहे. तर 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या: