मुंबई : मुलींचे भवितव्य सुरक्षित व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावे कमीत कमी 250 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 8.2 टक्के व्याज मिळते या योजनेत 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावील लागते. त्यानंतर मुलीचे वय 21 वर्षे झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम मिळते. दरम्यान, तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करू पाहणाऱ्यांनी या योजनेत वर्षाला 100000 रुपये गुंतवले तर म्यॅच्यूरिटीनंतर किती रुपये मिळतील, हे जाणून घेऊ या..


वर्षाला एक लाख रुपये गुंतवल्यास नेमके किती रुपये मिळणार


सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये जमा केल्यास तुमचे 15 वर्षांत एकूण 15,00,000 रुपये जमा होतील. या रकमेवर तुम्हाला व्याजाच्या रुपात 31 लाख 18 हजार 385 रुपये मिळतील. म्हणजेच 21 व्या वर्षी मॅच्यूरिटी झाल्यानंतर तुम्हाला एकूण 46 लाख 18 हजार 385 रुपये मिळतील. अशा प्रकारे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करू शकता. म्हणजेच तुम्ही 2024 साली या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास तुमची ही योजना 2045 साली म्यॅच्यूअर होईल. 


सुकन्या समृद्धी योजनेत खातं कसं खोलायचं? 


सुकन्या समृद्धी योजनेत खातं खोलायचं असेल तर बँख किंवा पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळावर जावं लागेल. तेथून तुम्हाला या योजनेसाठीचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. या फॉर्मची प्रिंट काढून त्यात सर्व माहिती भरावी. त्यानंतर फोट तसेच अन्य कागदपत्रं फॉर्मला जोडावेत. यात मुलीचे जन्म प्रमाणपत्र, फोटो, पालकाचे ओळखपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. तुम्ही भरलेला फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसच्या ब्रांजमध्ये जमा करावा. त्यानंतर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तुमच्या फॉर्मची तपासणी करतील. तुम्ही अर्जाला जोडलेली कागदपत्रे आणि तुमच्याकडे असलेली मूळ कागदपत्रे तपासली जातील. सर्व माहिती योग्य आहे, याची खात्री झाल्यानंतर अधिकारी तुमच्या मुलीचा सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज मंजूर करेल. एकदा खातं उघडल्यानंतर तुम्ही अनेक कामे ऑनलाईन माध्यमातून करू शकता. 


दोन मुलींसाठीच खातं खोलता येतं


सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक तीन महिन्यांनी मिळणाऱ्या व्याजाची समीक्षा केली जाते. प्राप्तकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत तुम्हाला करात सूट मिळते. या योजनेच्या अंतर्गत फक्त दोन मुलीसांठी तुम्हाला अर्ज करता येतो. 


हेही वाचा :


पीएफ काढताना फक्त 'या' चार गोष्टी करा, कधीच क्लेम रिजेक्ट होणार नाही!


अवघ्या दोन महिन्यांत होणार 35 लाख लग्न, तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार!


मोठी बातमी! रेल्वे क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्यांना कोट्यवधींच्या वर्क ऑर्डर्स, शेअर्स घेतल्यास देणार दमदार रिटर्न्स?