KBC 16 First Crorepati मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात  प्रश्नांची उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला कोट्यवधी रुपये जिंकण्याची संधी असते. केबीसीचं सध्या 16 पर्व सुरु आहे. 12 ऑगस्टपासून 16 व्यापर्वाला सुरुवात झालेली आहे. अमिताभ बच्चन यांच्या केबीसीच्या 16 व्या पर्वात एक कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक चंद्र प्रकाश ठरला आहे. चंद्र प्रकाश हा मूळचा जम्मू काश्मीरचा असून त्याचं वय केवळ 22 वर्ष आहे. चंद्र प्रकाश याला 7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळं चंद्र प्रकाश याला 1 कोटी रुपयांवर समाधान मानावं लागलं. एक कोटी रुपये केबीसीमध्ये जिंकले असले तरी नेमकी किती रक्कम त्याच्या खात्यात येणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 


किती टीडीएस आकारण्यात येतो? 


कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निश्चित करण्यात आलेल्या वेळेत दिल्यास स्पर्धकाला ठराविक रक्कम दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीनं 1 कोटी रुपये जिंकल्यास त्याच्या खात्यात पूर्ण रक्कम येत नाही. स्पर्धकाच्या खात्यात एक कोटी रुपये येत नाहीत. एक कोटी रुपयांवर टीडीएस आकारला जातो. भारतीय कायद्यांनुसार विजेत्या स्पर्धकानं जिंकलेल्या रकमेतून कलम 194 ब नुसार 30 टक्के टीडीएस आकारला जातो.  विजेत्या स्पर्धकाला सरचार्ज देखील द्यावा लागतो. सरचार्जची रक्कम टीडीएसच्या 10 टक्के असते म्हणजेच 30 लाख रुपये टीडीएस असल्यास त्यासोबत 3 लाख रुपये सरचार्जचे कमी होतात. टीडीएस आणि सरचार्च मिळून 33 लाख रुपये कमी होतात.  


सेस किती आकारला जातो?


जर एखाद्या स्पर्धकानं 50 लाख रुपये जिंकले तर त्याला सरचार्ज द्यावा लागत नाही. मात्र, यापेक्षा अधिक रक्कम त्यानं जिंकली असल्यास त्याला सरचार्ज द्यावा लागतो. सरचार्ज आकारल्यानंतर टीडीएसच्या रकमेच्या 4 टक्के रक्कम सेस म्हणून आकारली जाते. सोप्या भाषेत 33 लाख रुपयांवर 4 टक्के सरचार्ज आकारला जातो. जो 1 लाख 32 हजार रुपये असतो. त्यानुसार एखाद्या स्पर्धकानं 1 कोटी रुपये जिंकल्यास 34 लाख 32 हजार वजा केला जातील.


चंद्र प्रकाश यांच्या खात्यात किती रक्कम येणार?


कौन बनेगा करोडपती 16 च्या पर्वातील पहिला विजेता चंद्र प्रकाश ठरला आहे. टीडीएस, सरचार्ज आणि सेस वगळता चंद्र प्रकाशच्या खात्यात 65 लाख 68 हजार रुपये येतील.  


इतर बातम्या : 


Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 2 कोटी 40 लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी