मुंबई : सध्या भारतात सणासुदीचे दिवस आहेत. हे सण संपल्यानंतर संपूर्ण देशात लगीनसराई सुरू होणार आहे. भारतात दरवर्षी लाखो तरूण-तरुणी लग्नबंधनात अडकतात. दरवर्षी अनेक तरुण संसाराला लागतात. तर दुसरीकडे याच लग्नांमुळे कित्येक लोकांची भरभरून कमाई होते. या वर्षी अवघ्या दोन महिन्यांत तब्बल 35 लाख लग्न होणार आहेत. म्हणजेच या दोन महिन्यांत लग्नाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. याच काळात सोन्याचा भावही चांगलाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता


आपल्या मुलाचं लग्न मोठ्या धामधुमीत व्हावं यासाठी पालक वापरेमाप पैसे खर्च करतात. माझं लग्न मोठ्या थाटामाटात झालं पाहिजे, अशी प्रत्येक तरुण, तरुणीची इच्छा असते. त्यासाठी कित्येक वर्षांपासून तरुणांचं प्लॅनिंग चालू असतं. परिणामी याच लग्नामुळे अनेकजण कर्जबाजारी होतात. या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तब्बल 35 लाख लग्नं होणार आहेत. तसेच या लग्नांमध्ये एकूण 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. भारतात दरववर्षी साधारण एक कोटी विवाह होतात. मोठी आर्थिक उलाढाल होणारं हे सर्वांत मोठं चौथं क्षेत्र असल्याचे म्हटले जाते. लग्नामुळे नेकजण कर्जबाजारी होत असले तरी, याच काळात सेवा, व्यापार, वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रांत मोठी उलाढाल होते.   


सोन्याची मागणी वाढणार 


एका रिपोर्टनुसार सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात घट केली आहे. अगोदर सोन्यावरील आयातशुल्क 15 टक्के होते. आता ते 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याची मागणी वाढल्यामुळे भविष्यात किरकोळ बाजारातही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.


वाहन उद्योग, सेवा क्षेत्रात उलाढाल वाढण्याची शक्यता


लग्न आणि सणांच्या काळात खर्च वाढला का ज्वेलरी, वाहन उद्योग, सेवा या क्षेत्रातील उद्योगांनाही भरभराट येते. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या उद्योग क्षेत्रांना उभारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये साधारण 45 लाख लग्न होणार असल्यामुळे एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम पडण्याची शक्यता आहे.   


हेही वाचा :


Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 2 कोटी 40 लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी


Bank Job : परीक्षा न देता बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची अंतिम  तारीख किती?  


मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ