Railway PSU Stocks : सध्या शेअर बाजारात चांगलीच तेजी आली आहे. अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिेत आहेत. रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या काही कंपन्यांचाही यामध्ये समाावेश आहे. भारतीय रेल्वेसाठी काम करणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशन आणि रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES) या दोन कंपन्यादेखील भविष्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही कंपन्यांना नुकतेच कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार Railtel या कंपनीला नुकतेच 156 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. तर Rites लिमिटेड या कंपनीलादेखील दिल्ली मेट्रोकडून 88 कोटी रुपयांची एक ऑर्डर मिळाली आहे. याच कारणामुळे हे दोन्ही स्टॉक्स भविष्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RITES कंपनीला नेमकी कशाची ऑर्डर मिळाली?
RITES Ltd ही कंपनी रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करते. या कंपनीला दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून 87.58 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. खरं पाहता राईट्स लिमिटेड या कंपनीशी संबंधित असलेल्या एका उपकंपनीला ही वर्क ऑर्डर मिळाली आहे. या अपकंपनीत राईट्स या कंपनीची 49 टक्के हिस्सेदारी आहे. म्हणजेच एकूण 87.58 कोटी रुपयांच्या ऑर्डरपैकी साधारण 42.91 कोटी रुपयांची ऑर्डर राईट्स या कंपनीला मिळेल. आगामी तीन वर्षांत या वर्क ऑर्डरला पूर्ण करावं लागणार आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर 365 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका आठवड्यात हा शेअर 7 टक्क्यांनी तर दोन आठवड्यांत 8 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
RailTel कंपनीला नेमकी कशाची ऑर्डर मिळाली?
RailTel ही कंपनी रेल्वेसाठी टेलकॉम सेवा पुरवते. RailTel Corporation या कंपनीलादेखील गुरुवारी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर मोठी वर्क ऑर्डर मिळाली. या कंपनीला ग्रामीण विकास विभागाकडून 155.71 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याआधी या कंपनीला हेल्थ इंडिया इन्सुरन्स या कंपनीकडून 48.7 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
अवघ्या दोन महिन्यांत होणार 35 लाख लग्न, तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार!