success story : अलिकडच्या काळात तरुण शेती (Agriculture) क्षेत्रात विविध प्रयोग करताना दिसतायेत. पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीनं शेतीत काम करतायेत. तर काही तरुण चांगली नोकरी (Job) सोडून  यशस्वी शेती करतायेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. या तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतलाय. राजीव भास्कर (Rajiv Bhaskar) असं हरियाणातील (Haryana) या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने पेरु शेतीचा (guava Farming) यशस्वी प्रयोग केलाय. या माध्यमातून तो कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न घेत आहे. जाणून घेऊयाच त्याची यशोगाथा.


राजीव भास्कर हे हरियाणातील पंचकुला येथील शेतकरी आहेत. या तरुण शेतकऱ्याने थाई जातीच्या पेरुची यशस्वी लागवड केली आहे. या लागवडीतून शेतकरी मोठा नफा कमावत आहे. तसेच अनेकांना ते रोजगार देखील देत आहेत. या तरुण शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने यशस्वी उद्योजक म्हणून स्वत:नाव केलं आहे. तसेच स्वत:चा माल तो स्वत: विकत आहे. राजीव भास्कर यांचे पेरु हरियाणासह इतर राज्यातही विकले जातात. त्यामुळं त्यांना यातून चांगला फायदा मिळत आहे.  


2017 मध्ये चांगली नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात


2017 मध्ये राजीव यांनी चांगली नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला राजीव भास्कर यांनी पंचकुला येथे भाड्याने पाच एकर जमीन घेऊन थाई पेरुची लागवड केली होती. यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे त्यांना सेंद्रीय पद्धतीनं पेरुचं पिकं घेतलं होतं. त्यामुळं सुरुवातीला त्यांना कमी खर्चात अधिक नफा झाला. 2017 मध्ये राजीव यांना निव्वळ 20 लाख रुपयांचा नफा झाला. त्यानंतर राजीव यांनी आणखी थाई पेरुची लागवड करण्याचा निर्णय घेतला. इतर दोन जणांना सोबत घेऊन त्यांनी पंजाबमधील रूपनगर येथे 55 एकर जमीन भाड्यानं घेतली. यामधील 25 एकर क्षेत्रावर त्यांनी थाई पेरुची लागवड केली. आता या पेरुच्या बागेतून त्यांना कोट्यावधी रुपयांचा नफा मिळत आहे. 


शेतात पूर्णपणे सेंद्रीय खतांचा वापर 


राजीव भास्कर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भाड्याने जमिन घेऊन पेरुची लागवड करुन मोठं उत्पन्न घेतलं आहे. तसेच ही लागवड करताना त्यांनी आपल्या शेतात पूर्णपणे सेंद्रीय खतांचा वापर केला आहे. कोणत्याही प्रकारची रासायनिक खते त्यांनी शेतात वापरली नाहीत. किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजीव भास्कर यांनी पेरुच्या बागेला थ्री-लेअर बॅगिंग तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. 


प्रतिएकर सहा लाख रुपयांचा नफा 


राजीव भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा आणि हिवाळी अशी दोनदा विक्री केली जाते. दिल्लीच्या बाजारात पॅकींग करुन माल पाठवला जातो. यातून प्रतिएकर साधारणत: सहा लाख रुपयांचा नफा मिळत असल्याची माहिती राजीव भास्कर यांनी दिली.


महत्वाच्या बातम्या: 


टोमॅटोनं बदललं शेतकऱ्याचं जीवन, कमी खर्चात मिळवलं लाखो रुपयांचं उत्पन्न