Success Story : जीवनात मेहनती आणि जिद्दीच्या हिंमतीवर यश (Success) मिळवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची संघर्षमय यशोगाथा जाणून घ्या. त्यांची यशोगाथा जाणून घेतल्यावर तुम्हालाही आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याची प्रेरणा मिळेल. ही व्यक्ती म्हणजे ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेडचे ( Jyothy Laboratories Limited ) संस्थापक एम.पी. रामचंद्रन (M P Ramachandran). त्यांनी आपल्या मेहनतीने तरुण उद्योजकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
एकेकाळी पाच हजारांसाठी कर्ज घेण्याची वेळ, आज कोट्यवधींची उलाढाल
एम.पी. रविचंद्रन यांनी एकेकाळी पाच हजार रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला होता, आज त्यांच्या कंपनीची कोट्यवधींची उलाढाल आहे. आज एम.पी. रविचंद्रन 13,583 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. रामचंद्रन यांची कंपनी ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेड कपड्यांना पांढरं करणारं (Fabric Whitener) उजाला नील (Ujala Neel) बनवते. रामचंद्रन यांनी एवढे मोठे यश कसे मिळवले ते जाणून घ्या.
व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
एम.पी. रविचंद्रन यांना नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होती. काहीतरी वेगळं करण्याचा विचार नेहमी त्यांच्या मनात असायचा. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी लेखापाल म्हणून काम करायला सुरुवात केली. पण, त्यनंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार केला आणि भावाकडून पाच हजार रुपये उसने घेऊन तात्पुरता कारखाना सुरू केला. यावेळी त्यांनी काही वेगळे प्रोडक्ट बनवलं. त्यांनी मुलीच्या नावाने कंपनी सुरु केली. आज ज्योती लॅबोरेटरीज ही मल्टी ब्रँड कंपनी बनली आहे, हे त्यांची मेहनतीचे आणि चिकाटीचं फळ आहे. ज्योती लॅबोरेटरीजचे मार्केट कॅप सुमारे 13 हजार 583 कोटी रुपये आहे.
मुलीच्या नावाने सुरू केली कंपनी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम.पी. रविचंद्रन यांनी त्यांची मुलगी ज्योती हिच्या नावावरून त्यांनी कंपनीचं नाव ज्योती लॅबोरेटरीज ठेवलं. पांढर्या कपड्यांच्या लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, ज्योती लॅबने उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाइटनर तयार केलं. हे उत्पादन सुरुवातीला सहा महिलांच्या गटाद्वारे घरोघरी विकलं गेलं. यानंतर लवकरच उजाला सुप्रीम नीळने प्रत्येक भारतीय घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. ज्योती लॅबोरेटरीजने सुरुवातीला दक्षिण भारतात हात-पाय पसरले आणि 1997 पर्यंत, लॅबोरेटरीजचं जाळं देशभरात पसरलं. आज, उजालाचा राष्ट्रीय स्तरावर लिक्विड फॅब्रिक क्षेत्रात मोठा वाटा आहे.
ज्योती लॅबोरेटरीज प्रसिद्ध उत्पादने
ज्योती लॅबोरेटरीजची उजाला लिक्विड क्लॉथ व्हाइटनर आणि मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट (Maxo Mosquito Repellent Liquid) ही दोन महत्त्वाची उत्पादने देशभरात चांगलीच प्रसिद्ध आहेत. याशिवाय एक्सो डिश वॉश साबण (Exo Dish Wash Soap), प्रील डिशवॉश लिक्विड (Pril Dish Wash Liquid), मिस्टर व्हाईट डिटर्जंट (Mr. White Detergent), मार्गो बॉडी सोप (Margo Face & Body Soap) ही ज्योती लॅबोरेटरीजची काही उत्पादने आहेत.