Success Story: गुजरातमधील राजकोटमधील (Rajkot) एका छोट्या गावातून आपल्या कामाची सुरुवात करणारे मनीष अशोक भाई चौहान (Manish Ashok Bhai Chauhan) आज करोडोंच्या व्यवसायाचे मालक आहेत. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मनीषला लहानपणापासूनच कुटुंबाच्या गरजा समजल्या. अभ्यासासोबतच त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. या नोकरीमुळेच त्यांना स्वतःचे काम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. अभ्यासासोबतच मनीष यांनी चष्म्याच्या दुकानातही काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना महिन्याला 1200 रुपये मिळायचे. दुकानात काम करताना ते चष्मा बनवणं आणि डिझाइन करणंही शिकले. त्यानंतर दिवसा काम करण्यासोबतच रात्री चष्माही बनवायला सुरुवात केली. पाहुयात त्यांची यशोगाथाय
शार्क टँक इंडिया'चा तिसरा सीझन सध्या सुरु
टीव्ही रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया'चा तिसरा सीझन सध्या सुरु आहे. ज्यामध्ये अनेक उद्योजक आणि स्टार्टअप संस्थापक त्यांच्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी येतात. शार्क टँकच्या न्यायाधीशांना कोणत्याही उद्योजकाची व्यावसायिक कल्पना आवडते, ते त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे इंटेन्स फोकस व्हिजनचे सह-संस्थापक मनीष अशोकभाई चौहान यांनी देखील त्यांच्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी शार्क टँक गाठले होते.
मनिष यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली?
अभ्यासासोबतच मनीष यांनी चष्म्याच्या दुकानातही काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना महिन्याला 1200 रुपये मिळायचे. दुकानात काम करताना ते चष्मा बनवणं आणि डिझाइन करणंही शिकले. त्यानंतर दिवसा काम करण्यासोबतच त्यांनी रात्री देखील चष्मा बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. चष्मा बनवताना त्यांना कळले की ते काम करून महिन्याला फक्त 1200 रुपये कमावतात, मात्र अर्धा दिवस घरी काम करून ते यापेक्षा जास्त कमावतात. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.
सर्वप्रथम 2017 मध्ये त्यांनी भाड्याने दुकान घेतले. मनीषचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकानाच्या मालकाने पैसेही गुंतवले. काही वर्षात मनीषने आपला व्यवसाय नवीन उंचीवर नेला. आज 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यांची उत्पादने होलसेलमध्ये विकून ते दर महिन्याला 14-15 कोटी रुपये कमावतात. त्याचा व्यवसाय 20 राज्यात पसरलेला आहे. ज्यामध्ये त्यांचे चष्मे सुमारे 3000 आउटलेटवर विकले जातात.शार्क टँकच्या न्यायाधीशांना मनीषचा व्यवसाय इंटेन्स फोकस व्हिजन आवडला, पण त्याला निधी मिळू शकला नाही. त्यांनी 5 टक्के इक्विटीसाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या: