Success Story : अलिकडच्या काळात शेतकरी (Farmers) आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती करत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. सध्या आंब्याचा (mango) हंगाम सुरू झाला आहे. बाजारात आंबा विक्रीस येऊ लागलाय. अशातच एका शेतकऱ्यानं आंबा विक्रीतून मोठा नफा कमावलाय. आंब्याची ऑनलाइन विक्री करुन शेतकऱ्यानं 5 लाख रुपये मिळवले आहेत. मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील युवराज सिंह (Yuvraj Singh) असं शेतकऱ्याचं नाव आहे. आज आपण त्याची यशोगाथा पाहणार आहोत.
शेतकरी युवराज सिंह यांनी आपल्या बागेत 26 जातींचे आंबे लावले आहेत. पण सर्वात खास म्हणजे नूरजहाँ. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका आंब्याचे वजन सुमारे तीन किलो असते. ज्याची किंमत एक हजार रुपये किलो आहे.
'या' जातीच्या आंब्याची लागवड
युवराज सिंह यांनी एकाच हंगामात 5 लाख रुपयांचे आंबे ऑनलाइन विकले आहेत. त्यांच्या शेतात दोन हजार आंब्याची झाडे आहेत. या शेतकऱ्याने आंब्याची लागवड करुन आपले नशीब बदलले आहे. अलीराजपूर जिल्ह्यातील शेतकरी युवराज सिंह यांनी आपल्या बागेत लंगडा, केसर, चौसा, सिंदुरी, राजापुरी, हापूस अशा 26 जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. म्हणूनच त्याची बाग इतरांपेक्षा वेगळी आहे. हेच त्याचे उत्पन्न वाढण्याचे रहस्य आहे.
नूरजहाँ आंबा वैशिष्ट्यपूर्ण
आंब्याच्या अनेक जाती असूनही सर्वात खास म्हणजे नूरजहाँ. जिल्ह्यातील काठीवाडा येथून त्यांनी कलम करून नूरजहाँ आंब्याचे रोप आणल्याची माहिती युवराज सिंह यांनी सांगितली. हे आंबे माझ्या बागेत लावले आणि आज एका छोट्याशा रोपाचे आंब्याचे झाड झाले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका आंब्याचे वजन सुमारे तीन किलो असते, ज्याची किंमत एक हजार रुपये किलो आहे. राज्यात शेती फायदेशीर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी बागायती पिकांची मदत घेतली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने या क्षेत्रात चांगले यश संपादन केले आहे. यामध्ये अलीराजपूरचा शेतकरी युवराज सिंगचाही समावेश आहे. जिल्ह्यातील छोटा उंडवा गावातील शेतकरी युवराज यांनी आपल्या वडिलोपार्जित बागेचा विस्तार करून आंब्याची बाग तयार केली आहे.
आंब्याला मोठी मागणी, हंगामापूर्वीच लोक देतात आगाऊ पैसे
अलीराजपूर जिल्ह्यातील जमिनीत ओलावा आहे. त्यामुळं आंबा लागवडीसाठी ही जमीन योग्य आहे. इथे पिकणाऱ्या आंब्याच्या चवीला संपूर्ण देशात एक खास ओळख असल्याची माहिती युवराज सिंह यांनी दिली. अलीराजपूर आंब्याचे वैशिष्ट्य यावरुनही कळू शकते की लोक आंब्याची बुकिंग हंगामापूर्वीच आगाऊ पैसे देऊन करतात. युवराज सिंह यांनी सात वर्षांपूर्वी बागेत 500 आंब्याची रोपे लावली होती. आता त्यात केशर व इतर आंब्याची 2 हजारांहून अधिक झाडे आहेत. देशातील विविध शहरांमध्ये झालेल्या आंबा महोत्सवात त्यांना गेल्या दशकात अनेकवेळा प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
ऑनलाइन विक्रीचं व्यासपीठ
युवराज सिंह यांनी एका हंगामात 5 लाख रुपयांचे आंबे ऑनलाइन मार्केटद्वारे विकले होते. तसेच त्यांनी प्रत्येकी पाच किलोच्या आंब्याच्या पेट्या तयार केल्या होत्या. या आंब्याची त्यांनी ऑनलाइन विक्री केली. अलीराजपूर हा आदिवासी भाग असल्याने येथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आंबा आहे. ही मोठी बाजारपेठ असल्याने आंबा विकण्यासाठी लोकांना शहराबाहेर जावे लागत नाही.
महत्वाच्या बातम्या:
आंबा महागणार! हवामान बदलाचा पिकावर परिणाम, उत्पादनातही होणार घट