मुंबई : सध्या अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या विवाहाची सगळीकडे चर्चा आहे. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी या विवाहास उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अनंत आणि राधिका यांच्या प्रिवेडिंगचा खर्च तब्बल 1260 कोटी रुपये झाला. आता विवाहासदेखील कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हे देशातील सर्वांत महागडे लग्न असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, एकीकडे अनंत आणि राधिकाच्या लग्नाची चर्चा चालू असताना बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका शाही लग्नाबद्दल बोललं जातंय.
दोन दशकांपूर्वी विवाहाला 500 कोटी रुपये
साधारण दोन दशकांपूर्वी असेच एक लग्न थाटामाटात पार पडले होते. हे लग्न तेव्हा श्रीमंतांमध्ये गणना होत असलेल्या सुब्रत रॉय यांच्या मुलीचे होते. दोन दशकांपूर्वी झालेला हा विवाह तेव्हा सर्वांत महागडा विवाह ठरवण्यात आला होता. दोन दशकांपूर्वी या विवाहाला 550 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. भारतातील जवळजवळ सर्वच प्रतिष्ठित व्यक्तींनी तेव्हा या विवाहाला हजेरी लावली होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीही या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले होते.
10 हजारपेक्षा अधिक लोकांची लग्नाला हजेरी
वेगवेगळ्या माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार सुब्रत रॉय यांच्या मुलीचा विवाहसोहळा चार दिवस चालला होता. दोन दशकांपूर्वी या लग्नाला 550 कोटी रुपयांचा खर्च आला होता. सहारा उद्योग समुहाच्या मालकाच्या मुलीच्या या लग्नाची तेव्हा घरा-घरात चर्चा झाली होती. संपूर्ण जगात या लग्नाविषयी बोलले जात होते. या विवाहास एकूण 10 हजारपेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. सुब्रत रॉय यांनी देशातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीनां आमंत्रित केले होते.
तब्बल 100 प्रकारचे खाद्यपदार्थ
मुलीच्या विवाहासोबत सुब्रत रॉय यांनी एकूण 101 अनाथ मुलींचेही लग्न लावले होते. लग्नादरम्यान त्यांनी 15000 गरीब लोकांना अन्नदान केले होते. लखनौ येथे हा रॉय यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला होता. विवाहाला येणाऱ्या प्रतिष्ठांसाठी तेव्हा खासगी विमानांची सोय करण्यात आली होती. तसेच 100 पेक्षा अधिक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची मेजवाणी तेव्हा ठेवण्यात आली होती.
हेही वाचा :
100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 नामवंत पाहुणे, अनंत-राधिका यांच्या लग्नाचा खर्च किती?
शेअर बाजारात नवीन विक्रम! सेन्सेक्स प्रथमच 90 हजारांवर, निफ्टीनेही केला विक्रम