मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मुक्ता आर्टसच्या शेअरमध्ये  इंट्रा डेमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आणि  अप्पर सर्किट लागलं. मुक्ता आर्टसनं पुढील सहा वर्षांसाठी झी एंटरटेनेंट कंपनीसोबत पुढील सहा वर्षांसाठी एक करार केला आहे. आज मुक्ता आर्टसचा शेअर 16 रुपयांनी वाढून 97 रुपयांपर्यंत पोहोचला. 


मुक्ता आर्टसचा शेअर काल 81.11 रुपयांवर पंद धाला होता. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा 84 रुपयांपासून ट्रेडिंग सुरु झालं. काही वेळातचं मुक्ता आर्टसच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं. मुक्ता आर्टसचा शेअर सध्या 97.33 रुपयांना ट्रेड होत आहे. 


मुक्ता आर्टसनं 25 ऑगस्ट 2027 पासून पुढील 6 वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या 37 चित्रपटांच्या सॅटेलाईट आणि मिडिया अधिकारांसाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीनं हा करार नेमका किती रकमेचा आहे याबाबत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, मुक्ता आर्टसनं यापूर्वीच्या करारापेक्षा 25 टक्के अधिक रकमेवर करार करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
 
सुभाष घई यांच्या मालकीची असलेली मुक्ता आर्ट्स एटरटेनमेंट कंपनी चित्रपट निर्मिती करते. त्यासोबत टीव्ही चॅनेलसाठी कंटेंट तयार करते. याशिवाय कंपनी चित्रपट वितरण आणि चित्रपट निर्मितीसाठी उपकरण पुरवण्याचं काम करते. कॅपिटल मार्केट क्षेत्रात प्रवेश करणारी मुक्ता आर्टस ही चित्रपट निर्मिती क्षेत्रातील पहिली कंपनी होती. या कंपनीचा स्थापना 7 सप्टेंबर  1982 ला झाली होती. 


कंपनीची आर्थिक स्थिती


मुक्ता आर्टसनं 2023-24 मध्ये 27.52 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामध्ये त्यांना 10.33 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.2024-25 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या  तिमाहीत कंपनीनं 7.02 कोटी रुपयांची उलाढाल केली असून त्यांना 98 लाखांचा फायदा झाला आहे. बीएसईच्या नुसार कंपनीची मार्केट कॅप 216.37 कोटी रुपये आहे. मुक्ता आर्टसचा शेअर 52 आठवड्यांमध्ये  उच्चांकी पातळीवर 98.35 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


इतर बातम्या :


Share Market : पेटीएम, फोन पे अन्  गुगल पेला टक्कर देणाऱ्या कंपनीच्या आयपीओला सेबीची मंजुरी, 700 कोटी रुपये उभे करणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी