Bade Miyan Chote Miyan Funds : दिग्दर्शक अली अब्बाज जफरवर विरोधात निर्मात्याने फसवणुकीचा आरोप केला आहे. निर्माते भगनानी यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरवर पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाचे निर्माते वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरविरोधात आरोप केला आहे. अली अब्बास जफरवर पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला असून यासाठी निर्मात्यांनी पोलिसांतही धाव घेतली आहे. 


दिग्दर्शक अली अब्बाज जफरवर विरोधात फसवणुकीचा आरोप


पूजा एंटरटेनमेंटचे वासू भगनानी (Vashu Bhagnani) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) यांनी चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार दिग्दर्शकाने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिग्दर्शक अली अब्बास जफरसह हिमांशू मेहरा आणि आकाश रणदिवे यांचीही नावे समोर आली आहेत.


वासू आणि जॅकी भगनानीकडून FIR दाखल


'बडे मियाँ और छोटे मियाँ' चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. बडे मियाँ छोटे मियाँच्या पूजा एंटरटेनमेंटचे मालक वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी अली अब्बास यांनी निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांच्या तक्रारीनुसार अली अब्बास जफर आणि इतरांवर 9.50 कोटी रुपयांची फसवणूक, निधीचा गैरवापर, गुन्हेगारी कट, मनी लाँडरिंग आणि छळ यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अबुधाबी येथील एका फसवणूक कंपनीच्या मदतीने ही रक्कम वापरल्याचाही तक्रारीत समावेश आहे.


अली अब्बास जफरचे निर्मात्यांवर आरोप


‘बडे मियाँ छोटे मियाँ’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही आणि तो खूप फ्लॉप झाला. चित्रपट फ्लॉप झाल्यापासून निर्मात्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. बडे मियाँ छोटे मियाँचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी पूजा एंटरटेनमेंटच्या मालकांवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. अली अब्बासने चित्रपट दिग्दर्शनासाठी 7.30 कोटी रुपये फी भरल्याचा आरोप केला होता. मात्र निर्मात्यांनी त्यांची रक्कम दिली नाही.


यापूर्वी अली अब्बास जफरने निर्माता जॅकी आणि वाशू भगनानी यांच्यावर बडे मियाँ छोटे मियाँच्या दिग्दर्शनासाठी 7.30 कोटी रुपये फी न दिल्याचा आरोपही केला होता. ज्यानंतर निर्मात्यांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती की अली अब्बास जफर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी खोट्या अफवा पसरवत आहे.