Strongest Food Brands : जगातील 10 मजबूत फूड ब्रँड्समध्ये (Food Brands) दोन भारतीय ब्रँडचा (India Brand) समावेश करण्यात आला आहे. ब्रँड फायनान्सनुसार, चॉकलेट उत्पादने बनवणारी अमेरिकन कंपनी हर्शे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा प्रसिद्ध ब्रँड अमूल (Amul) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ब्रिटानियाचाही टॉप 10 मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेतील चार, भारतातील दोन, जपानमधील एक, व्हिएतनाममधील एक, चीनमधील एक आणि स्वित्झर्लंडमधील एका ब्रँडचा समावेश आहे. अमेरिकन ब्रँड्समध्ये हर्शे, डोरिटोस, चीटोस आणि स्टॉफरचा समावेश आहे.


पहिल्या क्रमांकावर अमेरिकेच्या हर्शे, ब्रँडचा समावेश आहे. चॉकलेट आणि कोको उत्पादने बनवणाऱ्या या कंपनीचे मुख्यालय पेनसिल्व्हेनिया येथे आहे. त्याची स्थापना मिल्टन एस. हर्षे यांनी 1894 मध्ये केली होती. सध्या मिशेल बक कंपनीचे सीईओ (CEO) आहेत. अमूल ब्रँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची मालकी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड आहे. ही एक सहकारी कंपनी असून 36 लाख शेतकरी संबंधित आहेत. याची स्थापना 14 डिसेंबर 1946 रोजी वर्गीस कुरियन आणि त्रिभुवनदास पटेल यांनी केली होती. याचे मुख्यालय आनंद, गुजरात येथे आहे. 2022 मध्ये त्याची एकूण कमाई 6.5 अब्ज डॉलर होती.


टॉप 10 मध्ये कोणते ब्रँड? 


टॉप 10 यादीत पहिल्या क्रमाकांवर अमेरिकन कंपनी हर्शे आहे. तर भारतातील अमूल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरे नाव अमेरिकन ब्रँड डोरिटोसचे आहे. फ्लेवर्ड चिप्सचा हा ब्रँड पेप्सिकोच्या मालकीचा आहे. या यादीत चिटोस चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची मालकीही पेप्सिकोकडे आहे. या यादीत ब्रिटानिया पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत जपानचा ब्रँड निसिन सहाव्या स्थानावर आहे. चीनचा हैतीयन ब्रँड सातव्या क्रमांकावर आहे. प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन बनवणारी ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या यादीत स्वित्झर्लंडचा लिंडट ब्रँड आठव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा स्टॉफरचा ब्रँड नवव्या तर व्हिएतनामचा विनामिल्क ब्रँड दहाव्या स्थानावर आहे.


महत्वाच्या बातम्या:


देशातील 'या' चार राज्यांमध्ये डाळिंबाचे 95 टक्के उत्पादन, महाराष्ट्राचा नंबर कितवा?