मुंबई: आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. बाजार बंद होतान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये एका अंकाची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.008 टक्क्यांची वाढ होऊन तो 62,130 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 18,497 अंकांवर स्थिरावला. 


आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1787 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1688 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 194 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना Asian Paints, Infosys, Eicher Motors, Titan Company आणि Kotak Mahindra Bank च्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर BPCL, Divis Laboratories, Coal India, Apollo Hospitals आणि UPL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. 


आज शेअर बाजार बंद होताना आयटी इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली. तर सार्वजनिक बँका आणि ऑईल अॅन्ड गॅसच्या इंडेक्समध्ये एका टक्यांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी वाढ झाली. 


रुपयाच्या किमतीत घसरण 


डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 27 पैशांची घसरण झाली आहे. शुक्रवारी रुपयाची किंमत ही 82.27 इतकी होती, आज ती 82.54 इतकी आहे. 


Yes Bank शेअर्समध्ये वाढ 


Yes Bank शेअर्सने गेल्या 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवारीही या शेअर्समध्ये तेजी होती. गेल्या दोन सत्रामध्ये या शेअर्सच्या किमतीत 20 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 


IT Shares: आयटी कंपन्यांची खराब कामगिरी 


भारतीय आयटी कंपन्यांची कामगिरी गेल्या एका दशकातील सर्वात खराब अवस्थेकडे सुरू असल्याचं दिसून येत आहे. 2023 मध्ये मंदीची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने यामध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार घाबरत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 


Gold Silver Price Today: सोन्याचे भाव स्थिर तर चांदीच्या भावात तेजी 


आज सोन्याच्या किमतीत काही बदल झालेला नसला तरी चांदीच्या किमतीत मात्र तेजी असल्याचं दिसून आलं आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,800 इतका आहे. तर 1 किलो चांदीच्या किमतीने 66,700 चा टप्पा पार केला आहे. 


आज या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • BPCL- 3.12 टक्के

  • Divis Labs- 1.98 टक्के

  • Coal India- 1.55 टक्के

  • UPL- 1.22 टक्के

  • Apollo Hospital- 1.22 टक्के


आज या शेअर्समध्ये घसरण झाली 



  • Asian Paints- 1.88 टक्के

  • Infosys- 1.41 टक्के

  • Kotak Mahindra- 1.18 टक्के

  • Titan Company- 1.18 टक्के

  • Eicher Motors- 1.12 टक्के