Share Market : आज शेअर बाजारात आयटी आणि धातूंच्या किंमतीत झालेल्या वाढीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे, दरम्यान आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. आज बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्येच शेअर बाजाराची सुरुवात गॅप-अपने होणार हे संकेत दिसत होते. शेअर बाजारावरील युक्रेन-रशिया संकटामुळे काल मोठी घसरण झाली होती, मात्र आज जागतिक स्तरावर सुधारणा दिसून येत आहे.
कसा उघडला बाजार
आज देशांतर्गत शेअर बाजारात सेन्सेक्सची सुरुवात 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह झाली आहे. सेन्सेक्स 333 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या उसळीसह 57,633 वर उघडला. तर निफ्टी 100 हून अधिक अंकांनी 17,194 च्या पातळीवर उघडण्यात यशस्वी झाला आहे.
निफ्टीतही सुधारणा
आज निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत आणि फक्त 3 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहेत. बँक निफ्टी 387.55 अंकांच्या किंवा 1.04 टक्क्यांच्या उसळीसह 37,759 वर व्यवहार करत आहे.
निफ्टीचे वाढणारे स्टॉक
कोटक बँकचे 2.25 टक्के आणि M&M चे शेअर्स 1.83 टक्क्यांनी वर आहे. मारुती 1.6 टक्के, टाटा 1.58 टक्के आणि एशियन पेंट्स 1.54 टक्के बळावर व्यवसाय करत आहे.
घसरण होणारे शेअर्स
आज बाजारात L&T, ओएनजीसी आणि एचयूएलचे समभाग घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार
शेअर बाजार प्री-ओपनिंगमध्ये किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी 70 अंकांच्या वाढीसह 17161 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. BSE सेन्सेक्स 317.25 अंकांच्या म्हणजेच 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 57,617 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
आशियाई बाजारात हिरवे चिन्ह
आशियाई बाजारातही आज तेजीसह व्यवहार सुरू आहे. शांघाय कंपोझिट, तैवान, कोस्पीमध्ये वाढ होत आहे. तर जपानचा निक्की फ्लॅट व्यवहार करत आहे आणि स्ट्रेट टाईम्समध्ये घसरणीचा लाल चिन्ह दिसत आहे. हाँगकाँगचा हँग सेंगही चांगली उसळी दाखवत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis: आम्ही कोणाला घाबरत नाही; रशियाच्या धमकीवर युक्रेनचे राष्ट्रपती गरजले
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha