RJ Rachana :  प्रसिद्ध दाक्षिणात्य आर जे रचनाचे (RJ Rachana) मंगळवारी (22 फेब्रुवारी) कार्डियक अरेस्टने निधन झाले. वयाच्या 39 व्या वर्षी रचनानं अखेरचा श्वास घेतला. रचना ही बेंगळुरू येथील जे. पी नगरमध्ये राहत होती.  रेडिओ मिर्ची या रेडिओ चॅनेलवरील विविध कार्यक्रमांमधून रचना ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती.  


'पोरी टपोरी रचना', अशी देखील रचनाची ओळख होती. रिपोर्टनुसार, रचना ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होती. वक्तृत्व कौशल्य आणि विनोदी शैलीनं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तिनं सिंपलगी ओंडू या चित्रपटामध्ये काम केले आहे. आर जे प्रदीपनं रचनाचा फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिला श्रद्धांजली वाहिली. त्याने पोस्टमध्ये लिहिले, 'रचना तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' 


आर. जे आणि अभिनेत्री सुजाता अक्षयाने देखील रचनाचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करून तिनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहिये की रचना आपल्या सर्वांना सोडून गेली आहे. ओम शांती.'


लावण्या बल्लाल यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे. 






कन्नड अभिनेता, टीव्ही होस्ट आणि अँकर निरंजन देशपांडे यांनी सांगितलं की, 'खरोखर ही धक्कादायक बातमी आहे. अजूनही विश्वास बसत नाही. RIP रचना'


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha