Share Market Opening On 4th November 2022 : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात ( Stock Market ) सुरुवातीच्या सत्रात किंचित उसळी पाहायला मिळाली. संमिश्र जागतिक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 102 अंकांच्या वाढीसह 60,936 वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांच्या वाढीसह 18,090 अंकांवर उघडला. आशियाई देशांच्या शेअर बाजारात एकीकडे घसरण सुरू असतानाही भारतीय शेअर बाजारात किंचित उसळण पाहायला मिळत आहे.


मेटल, ऑटो शेअर्समध्ये तेजी


मेटल्स, बँक, ऑटो, रिअल इस्टेट मीडिया, एनर्जी सेक्टरचे शेअर्स वधारताना दिसत आहेत. दुसरीकडे, आयटी, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सची विक्री सुरू आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत, तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह अंकांवर व्यवहार करत आहे. 


नफा मिळवणारे शेअर्स


आज शेअर बाजारात पुढील कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व्ह 2.65 टक्के, बजाज फायनान्स 1.05 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.87 टक्के, टाटा स्टील 0.78 टक्के, एसबीआय 0.70 टक्के, लार्सन 0.55 टक्के, मारुती सुझुकी 0.53 टक्के, बँक 0.53 टक्के, इंदू 49 टक्के आणि ICICI बँकेचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत. 


घसरलेले शेअर्स


सुरुवातीच्या सत्रात इन्फोसिस 1.13 टक्के, टीसीएस 0.97 टक्के, डॉ. रेड्डी 0.88 टक्के, टेक महिंद्रा 0.83 टक्के, एचसीएल टेक 0.78 टक्के, सन फार्मा 0.43 टक्के, एचयूएल 0.35 टक्के, एशियन पेंट्स 0.33 टक्के, भारती एअरटेल 0.33 टक्के आणि विप्रो शेअर्समध्ये  0.22 टक्क्यांच्या घसरण पाहायला मिळाली आहे.


बँकिंग शेअर्स तेजीत राहण्याची शक्यता


शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आज बँकिंग शेअर्स तेजीत राहू शकतात. शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी म्हटले की, आजच्या ट्रेडिंग सत्रात बँक निफ्टी 41150 ते 41250 च्या रेंजमध्ये उघडल्यानंतर 40800 ते 41400 दरम्यान व्यवहार करू शकतो. त्यांनी 41200 च्या स्टॉप लॉससह 41500 च्या लक्ष्यासाठी खरेदी सल्ला दिला आहे.