Stock Market Opening: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसत असून बाजाराची सुरुवात (Share Market Opening) घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारातही भारतीय शेअर बाजाराला पूरक संकेत मिळाले नाहीत. आज प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात किंचीत घसरण दिसून आली.


बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टी निर्देशांकात 8.50 अंकांची घसरण होत 16,475 अंकांवर खुला झाला. तर, सेन्सेक्स निर्देशांकात 10.20 अंकांची घसरण होत  55,258  अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास निफ्टी निर्देशाक 24 अंकांच्या घसरणीसह 16,459.70 अंकावर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स निर्देशांक 49 अंकांच्या घसरणीसह 55,218.72 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 20 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर, उर्वरित 30 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, बँक निफ्टीतही 124 अंकांची घसरण झाली असून  36,284 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 


मीडिया, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ऑइल अॅण्ड गॅस क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. या तीन क्षेत्रातही किंचिंत तेजी असून विक्रीचा दबाव असल्याचे दिसत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात 1.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, ऑटो शेअरमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकेतील शेअरमध्ये 0.37 टक्क्यांची घसरण दिसत आहे. 


आज बाजारात  एल अॅण्ड टी, सन फार्मा, एशियन पेंट्स, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, पॉवरग्रीड, मारुती सुझुकी, एचसीएल टेक आणि नेस्लेमधील शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


दरम्यान, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकात 497.73 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर, निफ्टी निर्देशांकात  147.20 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक  55,268.49 अंकांवर आणि निफ्टी 16,483.80 अंकांवर बंद झाला. 


मंगळवारी, बाजार बंद झाला तेव्हा 1119 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ नोंदवण्यात आली. तर, 2128 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. उर्वरित 138 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: