Stock Market : शेअर मार्केटमधून (Stock Market) आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज प्रथमच सेन्सेक्सने (Sensex)  विक्रमी पातळी गाठली आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने आज 79000 ची पातळी गाठली आहे. तर NSE चा निफ्टी 24000 च्या पातळीवर उघडला आहे. काल सेन्सेक्सने  78,759.40 ही सर्वोच्च पातळी गाठली होती. 


सेन्सेक्ससह निफ्टीनेही केला विक्रम


गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही तेजी आजही कायम राहिली आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने विक्रम करत आहेत. आज सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रम नोंदवत उच्चांक गाठला. सेन्सेक्सने 79 हजारांची पातळी ओलांडली, तर निफ्टीनेही 24 हजारांची विक्रमी पातळी ओलांडली. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज वाढ कायम आहे. शेअर बाजारात काल BSE सेन्सेक्सने 78,588.76 चा नवा विक्रम रचला होता. तर NSE निफ्टीने 23,859.50 चा ऐतिहासिक शिखर गाठलं होते. आज शेअर बाजाराने हा विक्रम मोडीत काढला आहे. आज सेन्सेक्सह निफ्टीच्या वाढीची विक्रमी पातळी गाठली आहे.


सकाळपासूनच बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार होत होते. सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर त्यातील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट त्याच्या मोठ्या सिमेंट डीलच्या आधारे मार्केटमध्ये टॉप गेनर बनली आहे आणि त्यानंतर JSW स्टीलचा क्रमांक लागतो. बाजार उघडण्यावेळी, बीएसईवर सूचीबद्ध समभागांची मार्केट कॅप 437.02 लाख कोटी रुपये होती. परंतू, उघडल्यानंतर अर्ध्या तासात ती 438.46 लाख कोटी रुपयांवर आली आहे. त्याचवेळी, बाजार उघडल्यानंतर एका तासानंतर म्हणजे सकाळी 10.12 वाजता, हा मॅकॅप 439.07 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. BSE वर व्यवहार झालेल्या 3296 समभागांपैकी 2060 समभागांमध्ये वाढ होत आहे. 1122 शेअर्समध्ये घट झाली असून 114 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.


कोणत्या शेअर्सला नफा आणि कोणत्या शेअर्सला तोटा 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे या कंपन्यांच्या शेअर्समधये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट या कंपन्या तोट्यात राहिल्याचे पाहायला मिळाले.


महत्वाच्या बातम्या:


सरकारच्या 'या' तीन कंपन्यात गुंतवणूक करणारे झाले मालामाल, दोन वर्षात तब्बल 1200 टक्क्यांनी रिटर्न्स!