Shani Dev : शनी (Lord Shani) जेव्हा आपली शुभ दृष्टी राशींवर टाकतो तेव्हा त्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. या राशींच्या (Zodiac Signs) लोकांचा कार्यकाळ फार सुखाचा असतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात (Moolank) मूलांकाच्या माध्यमातून करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत तुमची नेमकी परिस्थिती कशी असणार याचा अंदाज लावता येतो. 


आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे शनीचं वर्ष आहे. अंकज्योतिष शास्त्रानुसार, शनीचा शुभ अंक 8 आहे. 30 जूनला शनीची वक्री चाल होणार आहे. त्यामुळे येत्या 188 दिवसांपर्यंत कोणत्या जन्मतारखेच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. 


मूलांक 8 


कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. ज्या लोकांचा मूलांक 8 आहे त्या लोकांना येणार्‍या 188 दिवसांपर्यंत चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याला सुरुवात करू शकता. तसेच, व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमची तब्येत देखील चांगली असणार आहे. 


मूलांक 7 


कोणत्याही महिन्यातील 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या जन्मतारखेच्या लोकांना येणाऱ्या काळात अनेक शुभवार्ता मिळतील. या काळात तुमची अनेक थांबलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या गतीला वेग येईल. जे सिंगल तरुण आहेत ते रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्यावर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 


मूलांक 5 


कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार चांगला ठरणार आहे. तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. 


मूलांक 6 


कोणत्याही महिन्याच्या 6, 15, आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. य जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार भाग्याचा असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची लव्ह लाईफ फार चांगली असमार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज रवि योग, सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना मिळणार अपार लाभ, होणार पैशांची भरभराट