Stock Market Holiday मुंबई: भारतीय शेअर बाजार 20 नोव्हेंबरला बंद राहणार आहे. त्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवर कोणतंही कामकाज होणार नाही. शेअर बाजाराला सुट्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शेअर बाजाराला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  


कमोडिटी मार्केटला देखील सुट्टी


भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईला मतदानाच्या दिवशी सुट्टी असेल. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  


20 नोव्हेंबरला मतदान


महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व 288 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याशिवाय झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. याशिवाय देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या काही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय नांदेड आणि वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी राजकीय घडामोडी सुरु असतील त्यावेळी शेअर बाजाराला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मतदार मतदान करु शकतील, अशा अपक्षेनं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


नोव्हेंबरमध्ये एकूण 12 दिवस शेअर बाजार बंद


नोव्हेंबर महिन्यात एकूण 12 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणांच्यानिमित्तानं दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे. 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त सु्ट्टी होती, 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असेल. याशिवाय 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून 12 दिवस सुट्टी राहील.  


NSE वर सुट्टीचं नोटिफिकेशन जारी


नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबर  रोजी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं एनएसईला सुट्टी जाहीर करण्यात आलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 


इतर बातम्या :


''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण


ना अंबानी ना अदानी, कोण आहे भारतातील सर्वात मोठे देणगीदार? 2024 मध्ये आत्तापर्यंत दिली 2153 कोटी रुपयांची देणगी