Indian Top philanthropist: भारत देशात श्रीमंत लोकांची कमी नाही. अनेक लोक उद्योगपतीकडं कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. अनेक उद्योगपती आपल्याकडे येणाऱ्या संपत्तीचा काही भाग दरवर्षी दान करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? ही भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ना मुकेश अंबानी आहे ना गौतम अदानी आहे, तर शिव नाडर आणि कुटुंब हे सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार कुटुंब आहे. 2024 मध्ये आत्तापर्यंत या कुटुंबाने 2153 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून 407 कोटी रुपयांची देणगी
शिव नाडर आणि कुटुंब हे सध्या देशातील सर्वात मोठे देणगीदार आहेत. हा दर्जा प्राप्त करुन ते हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आले आहेत. ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शिव नाडर आणि कुटुंबाने 2153 कोटी रुपयांची देणगी दिली. यानंतर मुकेश अंबानी आणि कुटुंबाचे नाव आहे ज्यांनी 407 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
सर्वात मोठे 5 देणगीदार कोणते?
Hurun India Philanthropy List 2024 मध्ये शिव नाडर आणि कुटुंब 2153 कोटी रुपयांच्या देणगीसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब 407 कोटी रुपयांच्या देणगीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजाज यांचे कुटुंब 352 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 334 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर गौतम अदानी अँड फॅमिली पाचव्या स्थानावर असून त्यांनी 330 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
10 देणगीदारांनी दिलेली एकूण रक्कम किती?
2024 या आर्थिक वर्षात देशातील शीर्ष 10 दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे 4625 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या आधारे देशातील उद्योगपतींनी दिलेल्या एकूण रकमेपैकी 53 टक्के रक्कम टॉप 10 व्यावसायिकांनी दिली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून दान केलेली सर्वोच्च रक्कम मुख्यत्वे शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी आहे.