Pavitra Punia Sindoor: टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती तिच्या भांगेत सिंदुर लावताना दिसते. त्यामुळे तिचं लग्न झालं असल्याचं चाहत्यांना वाटू लागलं. पण जर तिचं लग्न झालं असेल तर तिचा नवरा कोण असाही प्रश्न चाहत्यांना पडत होता. अशा स्थितीत पवित्राने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तसेच तिने तिच्या भांगेत सिंदुर भरण्याचंही कारण सांगितलं आहे. 

Continues below advertisement


पवित्राने नुकतच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सिंदुर का लावते याचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर त्यांना मिळालं आहे.                                     


पवित्राने केला खुलासा                                        


पवित्राने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'माझ्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा सुरू आहे. मी भांगेत सिंदुर भरते, अशी चर्चा आहे. पण मला ते खूप आवडतं.  जे लोकं म्हणतायत की माझं लग्न झालं आहे, तर त्यांना मी सांगू इच्छिते की, मी हे सिंदुर धार्मिक रितीने लावते. माझं लग्न झालेलं नाही. मी दोन सिंदुर लावते, ज्याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.' 


पुढे पवित्राने म्हटलं की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, त्या दिवशी मी संपूर्ण जगाला या गोष्टीची कल्पना देईन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता ठेवा. तुमचा सीट बेल्ट बांधून ठेवा आणि मला त्रास द्या. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पवित्रा रियालिटी क्वीन्स ऑफ द जंगलमध्ये दिसली आहे. या शोमध्ये ती जंगलात जगताना दिसत आहे. या शोचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.






ही बातमी वाचा : 


VIDEO : मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक; दोन महिन्यांच्या चिमुकलीला उराशी बिलगल्याचा VIDEO Viral