मुंबई : सध्या शेअर बाजार तेजीत आहे. शेअर बाजाराची हीच स्थिती लक्षात घेता अनेक गुंतवणूकदार योग्य ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. दरम्यान आता सणांचा काळ आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत वेगवेगळे सण आहेत. त्यामुळे या काळात शनिवार आणि रविवार वगळता इतरही काही दिवस शेअर बाजार बंद असेल. त्यामुळे शेअर बाजार नेमका कोणत्या दिवशी बंद असेल? हे जाणून घेऊ या...
यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. या तीन महिन्यांत अनेक उत्सव आणि सण असणार आहेत. यातील काही सणांच्या दिवशी शेअर बाजारावर कोणताही व्यवहार होत नाही. या तीन महिन्यात महात्मा गांधी यांची जयंती आहे. तसेच ख्रिश्चन धर्मीयांचा ख्रिसमस हा सर्वांत मोठा सण आहे. या दोन्ही दिवशी शेअर बाजार बंद असेल. विशेष म्हणजे या तीन महिन्यांत फक्त बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसह इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटदेखील बंद असेल.
शेअर बाजार नेमका कधी बंद असणार?
येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यामुळे बीएसई हॉलिडे कॅलेंडर लिस्ट 2024 नुसार या दिवश शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी दिवळी हा सण आहे. त्यामुळे या दिवशीदेखील शेअर बाजारावर कोणताही व्यवहार होणार नाही. 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे. या दिवशीदेखील शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमास आहे. त्यामुळे या दिवशीदेखील शेअर बाजार बंद असेल. 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीनित्त स्पेशल ट्रेडिंग सेशन असेल. या स्पेशल ट्रेडिंग सेशनची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
शेअर बाजार 86 हजारांचा टप्पा पार करणार
सध्या शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळथ आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार या वर्षांच्या शेवटपर्यंत शेअर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा 90 हजारांचा टप्पा पार करू शकतो. शुक्रवारी मात्र सेनेक्समध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मात्र शुक्रवारी सत्रादरम्यान सेन्सेक्स 85978.25 अंकांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचलाह होता. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स 264.27 अंकांच्या घसरणीसह 85,571.85 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बजाराचा निफ्टी हा निर्देशांकदेखील दिवसाअखेर 37 अंकांच्या घसरणीसह 26,178.95 अंकांवर बंद झाला.
एमसीएक्स तीन दिवस बंद असणार
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये दिवसभरात दोन सत्र असतात. पहिले सत्र हे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत तस दुसरे सेशन संध्याकाळी 5 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत असते. 2 ऑक्टोबर रोजी एमसीएक्सवरील दोन्ही सेशन्स बंद असतील. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी एमसीएक्सवर सकाळचे सत्र बंद असेल. गुरु नानक जयंतीदिनी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी सकाळचे सत्र बंद असेल. तर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त एमसीएक्सवर दोन्ही सेशन्स बंद असतील.
हेही वाचा :
म्युच्यूअल फंडात मिळतात भरपूर रिटर्न्स, पण नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक करावी? जाणून घ्या....