Stock Market Closing On 24th January 2023: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय अस्थिर राहील्याचं दिसून आलं. आज सकाळी बाजाराची सुरुवात तेजीने झाली, पण ती तेजी नंतर कायम राहू शकली नाही. त्यामुळे बाजार बंद होताना प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अस्थिरता दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 37 अंकांच्या किंचित वाढीसह 60,978 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14 अंकांच्या घसरणीसह 18,104 अंकांवर बंद झाला.

Stock Market Closing On 24th January 2023: सेक्टरल अपडेट 

आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, आयटी, एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांना तेजी दिसली. तर बँकिंग, मेटल्स, एनर्जी या क्षेत्रांचे शेअर्स  घसरले. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही नफा वसुली दिसून आली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स तेजीत, तर 31 शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 14 तोट्यासह बंद झाले.

इंडेस्क्स किती अंकांवर बंद उच्‍च स्‍तर दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल?
BSE Sensex 60,978.75 61,266.06 60,849.12 00:00:52
BSE SmallCap 28,422.45 28,666.55 28,394.58 -0.43%
India VIX 13.66 13.81 13.30 0.29%
NIFTY Midcap 100 31,151.85 31,370.25 31,107.70 -0.39%
NIFTY Smallcap 100 9,531.10 9,606.10 9,516.15 -0.37%
NIfty smallcap 50 4,302.60 4,331.45 4,296.10 -0.20%
Nifty 100 18,245.35 18,323.75 18,210.50 -0.02%
Nifty 200 9,534.45 9,576.35 9,517.90 -0.07%
Nifty 50 18,118.30 18,201.25 18,078.65 -0.01%

Stock Market Closing On 24th January 2023:  हे शेअर्स राहिले तेजीत 

आजच्या ट्रेडिंग सत्रात टाटा मोटर्स 3.34%, मारुती सुझुकी 3.27%, एचसीएल टेक 1.37%, एचडीएफसी बँक 1.17%, एशियन पेंट्स 1.04%, एचडीएफसी 1.04%, इंडसइंड बँक 0.66%, टीसीएस 0.56%, आईसीएचडीआर 0.4%, टेक 0.4% टक्के, भारती एअरटेल 0.36 टक्क्यांनी, टायटन 0.25 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Stock Market Closing On 24th January 2023: या शेअर्समध्ये झाली घसरण 

अॅक्सिस बँक (Axis Bank) 2.50 टक्के, पॉवर ग्रिड (Power Grid) 1.76 टक्के, टाटा स्टील (Tata Steel) 1.31 टक्के, कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) 1.30 टक्के, लार्सन (Larsen) 1.18 टक्के, एसबीआय 1.06 टक्के, सन फार्मा (Sun Pharma) 0.84 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.61 टक्के, रिलायन्स डी (Reliance D). 59 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.  

शेअर बाजाराची सुरुवात तेजीने 

दरम्यान, आज शेअर बाजारात तेजीसह व्यवहार सुरू झाला, ज्यामध्ये बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 180.53 अंकांच्या म्हणजेच 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 61,122.20 वर उघडला. याशिवाय NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 65.40 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 18,183.95 वर उघडला. यातच सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्समध्ये तेजीसह व्यवहार होताना दिसला. तसेच आज निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्स ग्रीन लाईन गाठत तेजीत सुरु झाले. मात्र मार्केट बंद होताना बऱ्याच शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसलं. 

इतर महत्वाच्या बातम्या: