Urmila Matondkar Joined Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जम्मूच्या नगरेटा शहरातून 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सुरू झाली. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे. आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील (Urmila Matondkar) या यात्रेत सामील झाल्या. 


उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सामील! (Urmila Matondkar On Bharat Jodo Yatra)


उर्मिला मातोंडकर आज सकाळी आठ वाजता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. कॉंग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी उर्मिलाचं स्वागत केलं. भारत जोडो यात्रेत उर्मिला सहभागी झाल्याने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधींसोबत विविध विषयांवर चर्चा केली. आता सोशल मीडियावर उर्मिला (Urmila Matondkar) आणि राहुल गांधींचे (Rahul Gandhi) फोटो  व्हायरल होत आहेत. 






भारत जोडो यात्रा सामाजिकता जपणारी : उर्मिला मातोंडकर


भारत जोडो यात्रेदरम्यान उर्मिला मातोंडकर म्हणाल्याा,"भारत जोडो यात्रा' मला राजकारणापेक्षा सामाजिक वाटते. त्यामुळेच समाजाचं भलं करणाऱ्या या यात्रेत मी सहभागी झाले आहेत. या प्रवासात खूप प्रेम आणि आपुलकी आहे. हेच प्रेम आणि आपुलकी सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची आहे. जय भारत जय हिंद". 






भारत जोडो यात्रेत सेलिब्रिटींचा सहभाग!


राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रेत' मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पूजा भट्ट (Pooja Bhatt), अमोल पालेकर (Amol Palekar), रिया सेन (Riya Sen), स्वरा भास्कर (Swara Bhasker), रश्मी देसाई (Rashmi Desai), आकांक्षा पुरी (Akanksha Puri) आणि काम्या पंजाबी (Kamya Punjabi) असे अनेक कलाकार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आधी 'भारत जोडो यात्रेत' (Bharat Jodo Yatra) सामील झाले आहेत. 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेचा येत्या 30 जानेवारीला समारोप होणार आहे. 


संबंधित बातम्या


भारत यात्रेत सहभागी झालेली देविका कोण आहे? 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कसाबनं जिच्या पायावर झाडली होती गोळी