मुंबई :  गुरुवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला ठरला. बँकिंग, फार्मा आणि एफएमसीजी सेक्टरमधील शेअर्ससह  मिड-कॅप स्टॉक्समध्ये दिसून आलेल्या चौफेर खरेदीमुळे आठवड्याच्या आणि सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. 

मु्ंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 320 अंकांनी वधारत 65,828 अंकावर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 115 अंकांच्या उसळीसह 19,638 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या शेअरपैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.  तर, निफ्टी निर्देशांक 50 पैकी 39 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली. 

कोणत्या सेक्टर चढ-उतार?

आजच दिवसभरातील व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, बँकिंग, ऑटो, मेटल्स, मीडिया, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड  गॅस सेक्टरमधील स्टॉक्स तेजीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समधील तेजीमुळे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले.  

आज दिवसभरातील व्यवहारात हिंदाल्कोच्या शेअर दरात 5.53 टक्क्यांची तेजी दिसून आली. एनटीपीसीच्या शेअर दरात 3.59 टक्के, हिरो मोटोकोर्पच्या शेअर दरात 2.94 टक्के, डॉ. रेड्डीज लॅबमध्ये 2.91 टक्के, डिव्हीज लॅबमध्ये 2.73 टक्के टाटा मोटर्समध्ये 2.62 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

तर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 2.48 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, एल अॅण्ड टी 1.05 टक्के, एचसीएल टेकमध्ये 0.57 टक्के, टेक महिंद्रामध्ये 0.54 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.50 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,828.41 66,151.65 65,570.38 0.49%
BSE SmallCap 37,562.23 37,658.08 37,405.55 0.57%
India VIX 11.45 12.82 11.31 -10.68%
NIFTY Midcap 100 40,537.05 40,663.25 40,165.50 1.08%
NIFTY Smallcap 100 12,748.50 12,790.10 12,655.30 0.99%
NIfty smallcap 50 5,883.30 5,897.40 5,829.70 1.25%
Nifty 100 19,577.05 19,656.45 19,482.00 0.64%
Nifty 200 10,510.25 10,550.90 10,456.70 0.71%
Nifty 50 19,638.30 19,726.25 19,551.05 0.59%


गुंतवणूकदारांचा फायदा

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 29 सप्टेंबर रोजी 319.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. आधीच्यादिवशी म्हणजेच गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी 316.65 लाख कोटी रुपये होते. आज बाजार भांडवलात 2.45 लाख कोटींची वाढ झाली.