House Construction : आपलं स्वत:चं एक टुमदार घर असावं, हे पत्येकाचं स्वप्न असते. पण हे घराचं स्वप्न आता महागलं आहे. नवीन बांधकाम करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. आता सिमेंटनंतर घर बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सळईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशात स्टीलच्या किमंतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पोलाद कंपन्या लवकरच स्टीलच्या किंमती वाढवणार
पावसाळा हळूहळू संपत आहे. त्यामुळं देशभरात बांधकामाला गती मिळणार आहे. जे लोक त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्याची तयारी करत होते ते आता सुरू होणार आहे. मात्र, त्यांच्यासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सिमेंटनंतर सळईच्या दरात वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय पोलाद कंपन्या लवकरच स्टीलच्या किंमती वाढवू शकतात. कोकिंग कोळशाच्या महागाईमुळे स्टील कंपन्यांना जास्त खर्चाचा बोजा सहन करावा लागत आहे. अहवालानुसार, स्टील कंपन्या डिसेंबरपर्यंत किंमत वाढीची घोषणा करू शकतात. स्टीलच्या किमतीत 25 ते 50 डॉलर्स म्हणजेच 2000 ते 4000 रुपये प्रति मेट्रिक टन वाढ होण्याची शक्यता आहे.
सळईच्या किंमतीत सरासरी 10 ते 12 टक्क्यांची वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, काही स्टील कंपन्यांनी किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोल्ड उत्पादनांच्या किंमती सुमारे 12 ते 24 डॉलर्स प्रति टन म्हणजेच 2000 रुपये प्रति टन वाढवल्या आहेत. आता जर स्टीलच्या किंमती वाढल्या तर त्याच प्रमाणात स्टीलच्या रॉडच्या किंमतीही वाढणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घर बांधण्याच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे. घराचे काम मजबुत करण्यासाठी प्रामुख्याने सिमेंट आणि सळई गरजेची असते. घर बांधण्याच्या एकूण खर्चात या दोघांचा सर्वाधिक वाटा आहे. आता सळईच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत देशातील विविध शहरांमध्ये सळईच्या किंमतीत सरासरी 10 ते 12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सिमेंटचे दरातही मोठी वाढ
सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सिमेंटच्या दरात सरासरी 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. जेफरीज इंडियाच्या मते, सिमेंटच्या किंमती पूर्व भारतात सर्वाधिक वाढल्या आहेत. ऑगस्टअखेर सिमेंटचे जे भाव होते, ते सप्टेंबरअखेर 50 ते 55 रुपये प्रति पोतीपर्यंत वाढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: