मुंबईत : भारतीय स्टेट बँकेकडून हर घर लखपती योजना सुरु करण्यात आली आहे. ही एक रिकरिंग डिपॉझिट योजना आहे. म्हणजे या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. या योजनेचं नाव जरी हर घर लखपती असलं तरी गुंतवणुकीतून करोडपती देखील होऊ शकता. या योजनेत तुम्ही तुमच्यासह तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे देखील खाती उघडू शकता. त्यामुळं सर्व खात्यांचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा तुम्ही चांगली रक्कम गोळा करु शकता. कारण या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी मर्यादा नाही. 


उशिरानं रक्कम जमा केल्यास दंड 


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हर घर लखपती योजनेत निश्चित रक्कम दरमहा  रिकरिंग ठेव म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम जमा करण्याची तारीख चुकवल्यास दंड भरावा लागू शकतो. आरडीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढल्यास दंड देखील भरावा लागू शकतो. तीन वर्षे ते 10 वर्षांच्या ठेवीसाठी 6.75  ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर आहे.  याशिवाय 10 वर्षांपेक्षा अधिक ज्याचं वय असेल तो देखील गुंतवणूक करु शकतो. 


ज्या व्यक्तीचं वय 10 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना 6.75 टक्के व्याज मिळेल. तर,  ज्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना 7.25 टक्के व्याज मिळेल. 


एखाद्या व्यक्तीला 40 हजार रुपयांपेक्षा अधिक व्याज  या योजनेवर एका वर्षात मिळालं असेल तर त्याला 10 टक्क्यांप्रमाणं टीडीएस जमा करावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपयांची आहे. 


साधारणपणे सर्वसामान्य व्यक्ती 596 रुपयांनी गुंतवणूक सुरु करु शकतो. एक लाख रुपयांची रक्कम जमा व्हायला 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो. या योजनेवर त्याला 6.50 टक्क्यांनी व्याज मिळेल. तर, 3 वर्षांच्या कालावधीसाठी 2502 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तीन वर्षात  6.75 टक्क्यांप्रमाणं एक लाख रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.  


स्टेट बँकेत साधारण आरडी योजना देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये किमान 12 महिने गुंतवणूक करणं आवश्यक असतं. किमान एक वर्ष ते 10 वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करता येते. ही सुविधा  सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. दरमहा 100 रुपयांपासून आरडी सुरु करता येईल. उशिरानं रक्कम जमा झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो. जर,सलग सहा हप्ते थकल्यास खातं बंद करुन रक्कम खातेदाराच्या खात्यात वर्ग केली जाते. 


इतर बातम्या : 


Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या


Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष