Anil Ghanwat : अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळे, फुले व भाजीपाला पिकतो. परंतु किसान रेल बंद आहेत व प्रवाशी जलद रेल्वे गाड्यांमध्ये अपुरी जागा असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी या मार्गावर किसान रेल सुरू करावी या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्ष, जन संसद संघटना व पीपल्स हेल्पलाईन या सामाजिक संघटना 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, शासनाने जर दोन महिन्यात  किसान रेल सुरू केली नाही तर राज्यव्यापी रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वतंत्र भारत पक्षने दिला आहे. 


लवकरात लवकर किसान रेल  सुरु कराव्यात


शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतीमाल लवकरात लवकर व कमी खर्चात देशातील इतर बाजार पेठेत पोहोचवता यावा म्हणून केंद्र शासनाने अनेक किसान रेल सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होता होता. मात्र सरकारने बऱ्याच किसान रेल बंद केल्या आहेत.  महाराष्ट्रातून उत्तर भारतात व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या जलद प्रवासी गाड्यांमध्ये फक्त अर्धा डबा (बोगी) पार्सल साठी असतो. मोठ्या शहरातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये आगोदरच औद्योगिक कारखान्यांचा स्टील, लोखंडाचा माल, गाड्यांचे सुटे भाग भरले जातात. पुढील स्टेशनवर येणारा शेतमाल चढविण्यासाठी जागा रहात नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा माल पाठवला जात नाही व खराब होऊन जातो. पार्सलच्या डब्यात जागा कमी आल्यामुळे माल चाढवणारे ठेकेदार, प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अव्वाचे सव्वा हमाली वसूल करतात.


अहमदनगर कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन 


रेल्वे मंत्रालयाने बंद केलेल्या किसान रेल सुरू कराव्यात, गरज असेल तेथे नवीन किसान रेल सुरू कराव्यात. जेथे किसान रेलची सुविधा नाही तेथे प्रत्येक जलद प्रवासी गाडीला एक स्वतंत्र बोगी फक्त शेतीमालासाठी जोडण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी करण्यात आली. जर शासनाने किसान रेल दोन महिन्यात सुरू केली नाही तर राज्यव्यापी रेलरोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अनिल घनवट यांनी दिला आहे. दरम्यान,7 ऑक्टबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सायं 4 वाजे पर्यंत जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी अनिल घनवट, सीमाताई नरोडे, ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, विक्रम शेळके, लक्ष्मण रांजणे, शरद गद्रे, नीलेश शेडगे, सुनीता वानखेडे आदी नेत्यांची भाषणे झाली. आंदोलकांचा निवेदन निवासी जिल्हािकारी राजेंद्र पाटील यांनी निवेदन स्वीकारले अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.