मुंबई : 1 ऑगस्टपासून देशातील काही बँकांच्या व्यवहारांबाबतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यात अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक या बँका एक ऑगस्टपासून ट्रांजेक्शनच्या नियमात काही बदल करणार आहेत. यामधील काही बँका पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी फी वसूल करणार आहेत तर काही बँका मिनिमम बॅलन्स वाढवण्याची तयारी करत आहेत.


मेट्रो आणि शहरी भागात राहणारे बँक ऑफ महाराष्‍ट्राचे सेव्हिंग बँक अकाऊंट होल्डर्सला आता आपल्या अकाऊंटवर आधीच्या पेक्षा अधिक ज्‍यादा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे. बँकेने मेट्रो आणि शहरी भागात मिनिमम बॅलन्स 2,000 रुपये केला आहे, आतापर्यंत तो 1,500 रुपये होता. खात्यात यापेक्षा कमी बॅलन्स असल्यास मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपयांचा दंड लागणार आहे. अर्धशहरी भागातील शाखांमध्ये 50 रुपये तर ग्रामीण शाखांमध्ये दंडांची रक्कम 20 रुपये आकारली जाणार आहे.

IDBI bank | शासकीय व्यवहार आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही होणार; राज्य सरकाचा निर्णय


अॅक्सिस बँक ईसीएस ट्रांजेक्शनसाठी 25 रुपये घेणार

अॅक्सिस बँक आता ग्राहकांकडून प्रत्येक ईसीएस ट्रांजेक्‍शनवर 25 रुपयांची आकारणी करणार आहे. आधी हे फ्री होतं. आता बँकेने एकापेक्षा अधिक लॉकरच्या अॅक्‍सेसवर देखील चार्ज घेण्यास सुरवात केली आहे. बँक प्रति बंडल 100 रुपयांची कँश हँडलिंग फी देखील वसूल करणार आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या सेव्हिंग्स आणि कॉरपोरेट सँलरी अकाऊंट होल्‍डर्सना प्रत्येक महिन्यात पाच फ्री ट्रांजेक्‍शननंतर प्रत्येक कॅश विड्रॉलवर 20 रुपये डेबिट कार्ड-एटीएम चार्ज द्यावा लागणार आहे.

हे ही वाचा- एसबीआय बँक कर्मचाऱ्याच्या मुलाने उघडली चक्क डुप्लीकेट स्टेट बँक ब्रँच; शाखा बघून अधिकारीही थक्क!

याचप्रमाणे प्रत्येक नॉन-फायनांन्शियल ट्रांजेक्‍शनसाठी 8.5 रुपये घेतले जातील. पुरेसा बँलन्स नसेल तर मर्चेंट आऊटलेट या वेबसाईट तसेच एटीएमवर फेल्‍ड ट्रांजेक्‍शनसाठी 25 रुपये फी वसूल केली जाणार आहे. कोटक महिंद्रा बँक मिनिमम बॅलन्स मेन्टेन न केल्यास देखील पेनाल्‍टी घेणार आहे. हे खात्यांच्या कॅटॅगरीनुसार ठरवलं जाणार आहे. सोबत प्रत्येक चार ट्रांजेक्‍शननंतर प्रति ट्रांजेक्‍शन 100 रुपये विड्रॉल फी घेतली जाणार आहे. जर आपण या बँकांचे ग्राहक असाल तर बदललेल्या या नियमांची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे.