Silver Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Slver Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा झटका बसत आहे. अशातच आज चांदीनं 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचे दर 1 लाख रुपयांच्या वर आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी चांदी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीनं विकली जात आहे. वाढत्या दरामुळं चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दिल्लीसह हैदराबादमध्ये चांदीनं पार केला लाखाचा टप्पा
आज, चांदीच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, दिल्लीतील चांदीचा प्रति किलोचा दर हा 1,01,000 रुपयांच्या वर आहेत. हैदराबादमध्ये चांदीचा दर 1,03,000 रुपये प्रति किलो आहे. केरळमध्येही चांदी 1,03,000 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये ते 97,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे 2000 रुपयांची वाढ झाली होती.
चांदीचा भाव 1 लाखांच्या पुढे का गेला?
देशात सोने खूप महाग झाले आहे आणि आता गुंतवणूकदार सोन्याबरोबरच चांदीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. अनेकजण सोन्यापेक्षा जास्त चांदी खरेदी करण्याला जास्त महत्व देत आहेत. चांदी एक लाख रुपयांच्या वर पोहोचल्याने अनेकजण चांदीत गुंतवणूक करत आहेत. अनेक ठिकाणी चांदीच्या मागणीत वाढ देखील झाली आहे. त्यामुळं दरात वाढ होत असल्याचं देखील बोललं जात आहे.
कोणत्या शहरात चांदीचा किती दर?
अहमदाबादमध्ये चांदीची किंमत 97,000 रुपये प्रति किलो आहे.
अयोध्येतही चांदीची किंमत 97,000 रुपये प्रति किलो आहे.
दिल्लीत चांदीची किंमत 1,01,000 रुपये प्रति किलो आहे.
हैदराबादमध्ये चांदीची किंमत 1,03,000 रुपये प्रति किलो आहे.
केरळमध्ये चांदीची किंमत 1,03,000 रुपये प्रति किलो आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत किती?
आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात वाढ होत आहे. या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 1.58 टक्क्यांच्या वाढीनंतर 31.735 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा सवाल उपस्थित केला जातोय. सोन्या चांदीचे दर कधी कमी होणार? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
दसऱ्याला सोनं महागलं, दिवाळीपर्यंत 80 हजारावर जाणार, आजचा तोळ्याचा दर किती?