Gold Prices : भारतीय शेअर बजारात सध्या चढ-उतार पाहायला मिळतोय. मात्र सोने आणि चांदी (Gold And Silver Rate) हे मौल्यवान धातू मात्र भाव खाताना दिसतायत. गेल्या एका वर्षात या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव वाढला आहे. गेल्या धनत्रयोदशीशी तुलना केल्यास सोन्याच्या भावात एका वर्षात साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीने मात्र सोन्यापेक्षाही मोठी भरारी घेतली आहे. गेल्या काही महिन्यात चांदी सोन्यापेक्षा महागली आहे. दरम्यान, एका रिपोर्टनुसार आगामी काळात सोन्याचा भाव सव्वा लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळेच गुंतवणूकदार चांदीमध्ये गुंतवणूक करून नफा पदरात पाडून घेऊ शकतात. 


चांदीचा भाव 1.25 लाखांपर्यंत जाणार?


सध्या देशात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 81,060 रुपये झाली आहे. तर सोन्याचा भाव 1.12 लाख रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. असे असतानाच एका रिपोर्टनुसार सोनं आगामी कळात 86 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 1.25 लाख रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. म्हणजेच चांदी हा धातू परताव्याच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकू शकतो. 


चांदीबाबत नेमका अंदाज काय? 


मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या (Motilal Oswal) एका रिपोर्टनुसार दीर्घ ते मध्यम कालावधीच्या गुंतवणुकीत चांदी सोन्यापेक्षाही जास्त रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. आगामी 12 ते 15 महिन्यांत चांदीचा एमसीएक्सवर (MCX) भाव 1.25 लाख रुपये प्रति किलो तर कॉमेक्स (COMEX) वर 40 डॉलर्सचा का आकडा पार करू शकतो. चांदी हा धातू गुंतवणूकदारांना आतादेखील चांगले रिटर्न्स देत आहे. तुलनाच करायची झाल्यास चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षभरात साधारण 40 टक्के परतावा मिळत असून सध्या चांदीने भावाच्या बाबातीत एक लाख रूपये प्रति किलोचा टप्पा पार केला आहे. मोतीलाल ओस्वालच्या रिपोर्टनुसार सध्या चांदीत गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. सोबतच चांदीची इंडस्ट्रीयल मागणीही वाढली आहे.


सोन्याची नेमकी स्थिती काय? 


मोतीलाल ओस्वालच्या रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. सोन्यामध्ये मध्यम कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार करून 81 हजार रुपये तर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता 86 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचे लक्ष ठेवायला हवे. सोनं मध्यम कालावधीसाठी 2,830 डॉलर्सचा भाव तर दीर्घकालीन मुदत विचार घेता 3,000 डॉलर्सचा आकडा पार करू शखतो. मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्ममधील मानव मोदी यांच्या मतानुसार 2016 सालापासूनच सोनं हा धातू गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहे. सोन्याने घरगुती बाजारात तसेच कॉमेक्सवर साधारण 30 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याआधी भारतात दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशी (Dhanteras) हे महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे या काळातही सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे. या काळात सोन्यासोबतच चांदीचाही भाव वाढणार आहे.


हेही वाचा :


ह्युंदाईचा आयपीओ धडाम् झाल्याने स्विगीने IPO साठी घेतला मोठा निर्णय; नवी माहिती आली समोर!


एका वर्षात सोनं खरेदी करणारे मालामाल! अनेकांच्या तिजोऱ्या पैशांनी भरल्या; यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करावं का?


मोठ्या मनाचा अब्जाधीश! रतन टाटा यांनी लाडक्या कुत्र्यासाठी मृत्यूपत्रात केली मोठी तरतूद; 1000 कोटींच्या संपत्तीचे काय होणार?