Amazon Shopping to be Expensive : 31 मे नंतर अॅमेझॉन (Amazon) वरील उत्पादनांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Amazon त्याच्या विक्री पॉलिसीजमध्ये वाढ करणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही Amazon च्या कार्टमध्ये काही अॅड केले असेल तर 31 मे आधी ते त्वरीत ऑर्डर करा. ई-कॉमर्स वेबसाईट असणारी Amazon कंपनी विक्रीच्या फीज (Seller Fees) आणि कमिशन चार्जेसमध्ये (Commission Charges) मोठा बदल करणार आहे. ज्यामुळे 31 मे नंतर उत्पादनांच्या (Products) किंमतीत वाढ होणार असल्याचे समोर आले आहे.


प्रत्येक ई-कॉमर्स ऑनलाईन (Online) कंपनी आपली कमाई ही मिळालेल्या कमिशनद्वारे (Commission) करते. विक्रेते त्यांचे सामान ऑनलाईन वेबसाईट्सवर विकतात आणि त्याबदल्यात कंपनी संबंधित सामानाचे पैसे चार्ज करते. कंपनीने हा बदल अॅन्युअल प्रोसिजर करता केला आहे. यामुळे Amazon च्या प्लॅटफॉर्मवर काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत आणि याच कारणाने प्रॉडक्ट्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. कंपनीच्या क्लॉथ (Clothes), ब्यूटी (Beauty), मेडिसिन (Medicine) , ग्रॉसरी (Grocery) इत्यादी कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. 


कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बाजारातील बदलते वातावरण आणि मॅक्रो इकॉनॉमिक कारणांमुळे शुल्कात वाढ झाली आहे.


एवढ्या टक्क्यांची वाढ



  • औषध श्रेणीमध्ये, 500 रुपयांपर्यंतच्या उत्पादनांवर विक्रेत्याचे शुल्क 5.5 टक्क्यांवरुन ते 12 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर 500 रुपयांपेक्षा जास्त वस्तूंचे शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

  • कपड्यांमध्ये, 1,000 पेक्षा जास्त उत्पादनांवर शुल्क 19 टक्क्यांवरुन 22.5 टक्के करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सौंदर्य उत्पादनांवरील कमिशन वाढवून 8.5% करण्यात आले आहे. 

  • याशिवाय, कंपनीने देशांतर्गत वाहतूक केलेल्या उत्पादनांवरील डिलिव्हरी शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ केली आहे.


500 पेक्षा जास्त लोकांना नोकरीवरुन काढले 


ई-कॉमर्स (E-COMMERCE) कंपनी अॅमेझॉनने अलिकडेच 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीमध्ये छाटणीची प्रक्रिया सुरु आहे आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, एचआर आणि सपोर्ट स्टाफमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे. कंपनीने मार्च 2023 मध्ये जाहीर केलेल्या 9,000 नोकऱ्यांमध्ये कपातीची ही प्रक्रिया आहे. मार्चमध्ये, कंपनीने घोषणा केली की ती त्याच्या क्लाउड सेवा, जाहिरात आणि ट्विच युनिटमधून सुमारे 9,000 नोकऱ्या कमी करणार आहे. 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर काही आठवड्यांनंतर कंपनीच्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना मेमोद्वारे ही सर्व माहिती दिली.


हेही वाचा


आता Amazon Prime मेंबरशिपसाठी जास्त पैसे मोजावे लागणार, जाणून घ्या न्यू मेंबरशिप प्लान