Amazon Prime Membership Price Hike : ओटीटी प्लॅटफाॅर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही स्वस्त प्लॅन ऑफर करत असतात. अशातच ऑनलाईन विक्री सेवा क्षेत्रातील महाकाय कंपनी अॅमेझाॅनने एक नवा मेंबरशिप प्लॅन आणला आहे. त्यांच्या प्राईम मेंबरशिपच्या किमतीत (Amazon Prime Membership Price) कंपनीने काही बदल केले आहेत. याआधीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने स्वस्त मेंबरशिप प्लॅन घोषित केले होते. पण आता कंपनीने किंमतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 67 टक्के इतकी आहे. त्यामुळे आता प्राईम मेंबरशिप विकत घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावं लागणार आहेत. पण कंपनीने काही मेंबरशिप प्लॅनच्या जुन्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तुम्ही जर अॅमेझाॅन  मेंबरशिप प्लॅन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या नवीन प्लॅनच्या किंमती जाणून घ्या....


अॅमेझाॅन प्राईम मेंबरशिपच्या किमतीत झालेली वाढ? 


नुकतंच अॅमेझाॅन प्राईमने नव्या किमती घोषित केल्या आहेत. या सुधारित किंमतीनुसार, आता अॅमेझाॅन प्राईम मेंबरशिपची किंमत 299 रूपयांपासून असून हा प्लान फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठीच असणार आहे. याआधी कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये महिन्याला 179 रूपये इतकी किंमत ठेवली होती. म्हणजेच, प्लॅनच्या किमतीत 120 रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांसाठी असलेल्या अॅमेझॉन प्राईमच्या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. हा प्लान 459 रुपयांमध्ये उपलब्ध होता. याचाच अर्थ या प्लॅनमध्ये 140 रुपयांची वाढ झाली आहे. 


कंपनीने या प्लॅन्सच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही


यापूर्वीच्या अॅमेझाॅन प्राईमच्या प्लॅन्सशी सध्याच्या किमतीची तुलना केली, तर खूप अंतर असल्याचं दिसून येतं. पण आता नव्यानं जे युजर्स प्लान घेणार आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे, बऱ्याच दिवसांसाठी असलेल्या प्लॅन्सच्या किमती त्याच आहेत. सध्या अॅमेझॉन प्राईमच्या वार्षिक प्राईम मेंबरशिपची किंमत 1499 रुपये आहे. त्यामुळे जुन्या प्राईम मेंबरशिपच्या प्लॅनमध्ये अजून तरी बदल केल्याचं दिसून येत नाही. 


 


अॅमेझाॅन प्राईम मेंबरशिप प्लॅन्सचे फायदे?


ज्या ग्राहकांनी आधीपासूनच अॅमेझाॅन प्राईमचे मेंबरशिप विकत घेतली आहे, त्या ग्राहकांना इतर युजर्सच्या तुलनेत वेगवान सेवा मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना प्राईम व्हिडीओ, प्राईम म्युझिक, प्राईम रीडिंग, प्राईम डिल्स, प्राईम गेमिंग आणि अॅमेझाॅन फॅमिली यांचा अॅक्सेस उपलब्ध आहे. त्यामुळे लाँग टर्म प्लॅनमध्ये अॅमेझाॅन प्राईमची मेंबरशिप घेतल्यास  पेैशाचीही बचत होईल आणि अनेक पर्यायही मिळणार आहेत.