capricorn Horoscope Today 19 May 2023: मकर (Capricon) राशीच्या लोकांवर आज काही कार्य सोपवले जाईल, ते तुम्हाला पूर्ण करावे लागेल. तुमची मुलं तुमच्याकडे काही गोष्टींची मागणी करतील. त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. बहिणीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. तसेच तुमची मुलं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतील आणि त्यात यश मिळवतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे (Rashibhavishya).
नोकरदारांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी असणार आहे. बँकिंग आणि मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आज नोकरदारांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, इकडे तिकडे लक्ष दिल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अतिरिक्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करु शकाल. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. नोकरीसोबतच आणखी काही काम देखील तुम्ही करु शकता, जेणेकरुन तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
उच्च शिक्षणासाठी काळ चांगला
जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे, तरच तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील, सर्वजण धार्मिक कार्यक्रमात एकत्र सहभागी होतील, तिथे थोडा वेळ घालवतील, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या आईला सांगाल. आज वरिष्ठ सदस्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही पूर्ण करावी लागतील. लहान मुलं तुम्हाला काही मागण्या करतील, त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे तुमच्या मनाला देखील बरे वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
मकर राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
वैवाहिक जीवनात जुन्या गोष्टीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींना विसरुन जाणे चांगले होईल.
आजचे मकर राशीसाठी आरोग्य
प्रकृती ठीक राहिल परंतु थोडा थकवा जाणवेल. त्यामुळे काही काळ विश्रांती घ्यावी.
मकर राशीसाठी आजचे उपाय
पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्यास फायदेशीर ठरु शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मकर राशीच्या लोकांसाठी आज हिरवा रंग शुभ असेल. तर, 9 हा अंक या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)