मुंबई : सध्या पुण्यातील औषधनिर्मिती क्षेत्रात काम करमाऱ्या एमक्युअर फार्मास्यूटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या आयपीओची सगळीकडे चर्चा आहे. या आयपीओला साधारण 67.87 पटीने सबस्क्राईब करण्यात आले आहे. शार्क टँकफेन नमिता थापर या कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. दरम्यान, या आयपीओमुळे निमता थापर यांना एक प्रकारे लॉटरीच लागली आहे. कारण त्या आयपीओच्या माधअयमातून साधारण 12.68 लाख शेअर्स विकणार आहेत. यातून त्यांना तब्बल 127 कोटी रुपये मिळणआर आहेत. थापर यांच्याकडे एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीचे एकूण 63 लाख शेअर्स आहेत. त्यांच्याकडे कंपनीची 3.5 हिस्सेदारी आहे.
नमिता थापर शार्क टँकच्या जज
नमिता थापर या उद्योग क्षेत्रात आघाडीच्या नावांपैकी एक आहेत. औषधनिर्माण उद्योगात तर त्यांचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जाते. शार्क टँक या शोमधील त्या सर्वाधिक श्रीमंत जजेसपैकी एक आहेत. शार्क टँकच्या तीन सझनच्या त्या जज राहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती साधारण 600 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे आलिशान घर आणि महागड्या गाड्या असल्याचे म्हटले जाते.
अमेरिकेत शिक्षण, बिझनेस हेड म्हणून काम
एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीची स्थापना नमिता थापर यांचे वडील सतीश थापर यांनी केलेली आहे. नमिता यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतलेले आहे. ICAI या संस्थेतून त्यांनी चार्टर्ड एकाउंटंटची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन एमबीएची पदवी मिळवली. अमेरिकेत त्यांनी मेडिकल डिव्हाईस कंपनी Guidant Corporation येथे बिझनेस हेड म्हणून काम केले होते.
शार्क टँकच्या माध्यमातून मिळाली ओळख
अमेरिकेत त्यांनी साधारण सहा वर्षे काम केले. त्यानंतर 2007 साली त्या भारतात परतल्या आणि एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीत सीएफओ पदावर रुजू झाल्या. पुढे त्यांच्याकडे कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी आल. एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीसह नमिता थापर Incredible Ventures Ltd या कंपनीचेही नेतृत्त्व करतात. शार्क इंडियाच्या पहिल्या सिझनमध्ये प्रत्येक एपिसोडसाठी त्यांना आठ लाख रुपये दिले जायचे. त्यांनी या शोमध्ये 25 कंपन्यात साधारण 10 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. यामध्ये Bummer, Altor, InACan तसेच Wakao Foods यांचा समावेश आहे. नमिता थापर यांनी एमक्युअर फार्मास्यूटिकल्स या कंपनीत काम करणाऱ्या विकास थापर यांच्याशी विवाह केला.
नमिता थापर वापरतात 20 लाखांचा बूट
नमिता थापर कोट्यवधीच्या मालकीण आहेत. त्या त्यांच्या आलिशान राहणीमानामुळे ओळखल्या जातात. पुण्यात त्यांचा एक बंगला आहे. या बंगल्याची किंमत साधारण 50 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. यासह त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यामध्ये दोन कोटींची BMW X7, एक Mercedes-Benz GLE आणि एक Audi Q7 अशा गाड्यांचा समावेश आहे. शार्क टँक इंडियाचे जज राहिलेल्या अमित जैन यांनी नमिता थापर यांच्या जीवनशैलीबाबत एकदा माहिती दिली होती. जैन यांच्या मतानुसार नमिता थापर 20 लाख रुपयांचा बूट वापरतात.
हेही वाचा :
प्रतिमहिना जमा करा 3000 अन् मिळवा 10000000 रुपये; जाणून घ्या एसआयपीचा जबरदस्त फॉर्म्यूला!
500 कोटींचा हिरेजडित नेकलेस, 54 कोटींची रिंग; निता अंबानींच्या जुन्या लुकची नव्याने चर्चा!
खिशात पैसे घेऊन राहा तयार! मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी