Rahul Gandhi Stock: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) फक्त राजकारणारच सक्रीय आहेत, असे नाही. ते चांगले गुंतवणूकदारही आहेत. त्यांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स घेतलले आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग (Vertoz Advertising) या कंपनीने गेल्या काही दिवसांत उत्तम कामगिरी केलीआहे. या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी आहे. ही एक डिजिटल कंपनी असून शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल सध्या 153.63 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
राहुल गांधी यांच्याकडे व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीचे एकूण 260 शेअर्स होते. स्टॉक्स स्प्लिटनंतर आता या शेअर्सची संख्या 2600 एवढी झाली. या कंपनीने नुकतेच बोनस शेअर्सही जारी केले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडील 2600 शेअर्स आता 5200 पर्यंत वाढले आहेत. म्हणजेच व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढल्यामुळे आता राहुल गांधी यांनादेखील मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे झाला फायदा
व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग या कंपनीचा शेअर गुरुवारी (6 जुलै) 686.50 रुपयांपर्यंत पोहोचला. शुक्रवारी हा शेअर 1:10 या प्रमाणात स्प्लिट करण्यात आला. त्यामुळे या शेअरचे मूल्य सध्या 36 रुपये झाले होते. शुक्रवारी या शेअरच्या मूल्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली. या अपर सर्किटनंतर या शेअरचे मूल्य सध्या 36.05 रुपयांवर पोहोचले आहे. या शेअरमध्ये प्री-स्प्लिट, प्री-बोनस आणि प्राईस अॅडजेस्टमेंटमुळे राहुल गांधी यांच्याजवळच्या शेअर्सची संख्या 5,200 रुपये झाली आहे. या कंपीने 1:1 या प्रमाणात बोनसचही घोषणा केली होती. 30 जुलै 2024 या तारखेपर्यंत कंपनी बोनस शेअर जमा करेल, असं या कंपनीने जाहीर केलं होतं.
व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग कंपनी नेमकं काय करते?
व्हेरटोज अॅडव्हर्टायझिंग हा एक मॅडटेक आणि क्लाउडटेक प्लॅटफॉर्म आहे. बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, जाहिरात एजन्सी, डिजिटल पब्लिशर्स, क्लाउड प्रोव्हायडर्स आणि टेक कंपन्यांना डिजिटल जाहिरात, मार्केटिंग, मॉनिटायझेशन (मॅडटेक), डिजिटल ओळख और क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर (क्लाउडटेक) आदी सेवा ही कंपनी देते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :