krystal integrated services : विविध सेवा प्रदान करणाऱ्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस (krystal integrated services) कंपनीच्या शेअर्स मध्ये पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. सुरुवातीला क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसने शेअर बाजारात (Stock Market) दमदार एन्ट्री केली होती. मात्र, दुपारनंतर कंपनीचे शेअर्स कोसळले, त्यामुळं काही वेळातच IPO गुंतवणूकदारांची निराशा झाली. दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड आणि नीता लाड यांच्या क्रिस्टल इन्टीग्रेटेड सर्व्हिस लि. कालच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) यादीत सहभागी झाली आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थितीत होते. 


क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसने शेअर बाजारात चांगले पदार्पण केले  आहे. ही कंपनी सुरुवातीला 770 प्रति शेअरवर सूचीबद्ध झाली होती. जी त्याच्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 10 टक्क्यांची वाढ दर्शवते. कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर, आयपीओ किंमतीच्या तुलनेत प्रति शेअर 721 वर व्यापार केला.


सुरुवातीला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद 


क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीचा 300.13 कोटींचा IPO 14 ते 18 मार्चपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं 13.49 पट सबस्क्राइब झाला होता. दरम्यान, IPO अंतर्गत 175  कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करण्यात आले आहेत. तसेच 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 17.50 लाख शेअर्स जारी करण्यात आलेत. दरम्यान, ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळतील. तर कंपनी नवीन शेअर्सद्वार उभारलेल्या पैशांचा वापर खेळत्या भांडवलाची गरज यासह कर्जाची परतफेड, नवी यंत्रसामग्री यासाठी करेल. 


2000 मध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसची स्थापना 


क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस सुविधा व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. हाऊसकीपिंग, स्वच्छता, लँडस्केपिंग, बागकाम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सेवा, कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण यासह अनेक सेवा देते. ही कंपनी स्टाफिंग, पेरोल व्यवस्थापन, खासगी सुरक्षा, मॅनड गार्डिंग आणि केटरिंग सेवा देखील देते. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! फेडरल रिझर्व्हकडून सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर, भारतीय शेअर बाजारात गगनभरारी